Download App

Dinesh Phadnis Passed Away: CID फेम फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड !

CID fame Dinesh Phadnis Death : सीआयडी (CID) या लोकप्रिय सिरियलमधील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


सीआयडी या सीरियलमध्ये दयाच्या भूमिकेत दिसणारे आणि दिनेश फडणीस यांचे खास मित्र दयानंद शेट्टी यांनी काल (04 सोमवार) दिनेश यांची हेल्थ अपडेट देत असताना सांगितले की “लीवर, हृदय आणि किडनीसंबंधित समस्यांचा दिनेश यांना सामना करावा लागत होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. 30 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर मुंबईतील बोरिवलीतील दौलत नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिनेश यांनी रुपेरी पडद्यावरील अनेक सिरीयलसह सिनेमात देखील उत्तम अभिनय केलं आहे. दिनेश फडणीस सीआयडीच्या सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाबरोबर जोडले गेले आङेत. सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी चाहत्यांचे जोरदार मनोरंजन केलं आहे. दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जोस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती दयानंद शेट्टी यांनी दिली होती. मात्र अशातच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

दिनेश फडणीस यांनी टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘सरफरोश’मध्ये त्याने इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. तो ‘सुपर 30’ चित्रपटातही दिसला होता. 2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘मेला’ या चित्रपटातही त्याचा कॅमिओ दिसला होता. 2001 मध्ये रिलीज झालेल्या ऑफिसरमध्ये तो इन्स्पेक्टरच्या भूमिकेतही दिसला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज