Download App

Exclusive: CM एकनाथ शिंदेची सिनेमात एन्ट्री, ‘धर्मवीर 2’ मध्ये साकारणार स्पेशल रोल

Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून 'धर्मवीर 2' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाबाबात मोठी माहिती समोर येत आहे.

CM Eknath Shinde Role In Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे (Marathi Movie) यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर 2’ हा (Dharmaveer 2 Movie) सिनेमा जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोबत आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

“लोकसभेला दुर्लक्ष झालं पण, विधानसभेला लक्ष द्या”; अजितदादांचं सातारकरांना खास आवाहन

‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर 2’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. मुख्यमंत्री शिंदे या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या या भूमिकेविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चित्रपटात दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष…; आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

‘धर्मवीर – 2’ या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे.लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरा मन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर – 2’ चित्रपटातील गाणी पाहिल्यावर चित्रपटाचं कथानक, कलाकार यविषयाची लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे.

follow us