Asha Bhosle : लतादीदीनंतर आणखी एक तारा निखळला; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली आशा भोसलेंना श्रद्धांजली

Asha Bhosle :  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज  वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी

Asha Bhosle

Asha Bhosle

Asha Bhosle :  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज  वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 11 एप्रिलच्या रात्री दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भोसले यांच्या निधनाने संगित, कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाची बातमीसमोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला.

मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या.

इराण-अमेरिका करार अपयश; चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काय?

त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति

Exit mobile version