Download App

Women’s Day : कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन, भव्य बाईक रॅलीचे आयोजन

Colors Marathi Celebrated Women Day: जगभरात सगळीकडे महिला दिन (Women Day) साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन (Women Day) साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या ‘महिलांची भव्य बाईक रॅली’ला अनेक कलाकारांनी (Bike Rally) दिमाखात हजेरी लावली.

यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या (Colors Marathi ) या खास बाईक रॅलीमध्ये ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील रत्नमाला (निवेदिता सराफ), कावेरी (तन्वी मुंडले), ‘काव्यांजली’मधील मीनाक्षी ( पूजा पवार), काव्या (कश्मिरा कुलकर्णी) सहभागी झाल्या होत्या.

शिवाय या रॅलीचे खास आकर्षण करण्यात आले होते ती, लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या ‘इंद्रायणी’ मालिकेतील ‘इंदू’ म्हणजेच सांची भोईर. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या महिला रायडर्सना यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. तसेच या रॅलीमधील महिला रायडर्सना ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट ड्रेस’, ‘बेस्ट बाईक सजावट’, ‘बेस्ट संदेश’ असे विशेष पुरस्कारही या मराठी कलाकारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ‘महिला उद्योजिका अचिव्हर्स 2024 अवॉर्ड’चे वितरणही यावेळी करण्यात आले.

Laapataa Ladies Special Offer: किरण रावने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज गिफ्ट…

महिलांचे कार्य, कर्तृत्व, व्यवस्थापन, कलागुण हे प्रभावशाली असतात. म्हणूनच त्यांचे हे अनन्यसाधारण महत्व पटवून देण्यासाठी खास महिला दिन साजरा केला जातो. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत असतानाच रुपेरी पडद्यावरही महिलांचे कर्तृत्व अधोरेखित केले जाते. कलर्स मराठीवरील देखील अशाच महिलांना सन्मान या शोच्या माध्यमातून करण्यात आला.

follow us