Download App

Pragati Srivastava: कलर यलो प्रॉडक्शन्समध्ये प्रगती श्रीवास्तवची धमाकेदार एंट्री

Pragati Srivastava: आनंद एल राय यांचा दूरदृष्टी दिग्दर्शनाचा प्रवास सगळ्यांना माहीत असून कलर यलो प्रॉडक्शन्स आजवर अनेक नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना उत्तम काम करण्याची संधी दिल्या आहेत. (Pragati Srivastava) तसेच त्यांनी अंश दुग्गल याला लॉन्च (Social media) केल्याची घोषणा केल्यानंतर प्रगती श्रीवास्तव ही कलर येलो प्रोडक्शनचा एक महत्वाचा भाग झाली आहे.


तसेच नव्या कलाकारांना हक्काचं स्थान देऊन त्यांचा कलागुणांना जोपासण्यासाठी आणि कथाकथनाची क्षितिजे एक्सप्लोर करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आला आहे.हे एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट जगतातील पदार्पण आहे असे वाटू शकते. परंतु प्रत्यक्षात इतरांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे हे माझे पदार्पण आहे. असं आनंद एल राय यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रगती श्रीवास्तव ही कलर यलो प्रॉडक्शनच्या आगामी प्रकल्पांसाठी अंश दुग्गलसोबत बघायला मिळणार आहे. आता हे दोघे काय नवीन करणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. अभिनेता अंश दुग्गल हा आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण करणार आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. तसेच तो एका पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

Ansh Duggal करणार आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण

दरम्यान आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत. ते नेहमीच नवनवीन चेहऱ्यांना पडद्यावर आणत असतात. आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्सच्या आगामी प्रोजेक्ट्बद्दल सांगायचे झाले तर त्यांचे ‘तेरे इश्क में, फिर आयी हसीन दिलरूबा, झिम्मा 2 आणि नुकताच मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचे तुरा रोवणारा आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Tags

follow us