Ansh Duggal करणार आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण

Ansh Duggal करणार आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण

Ansh Duggal : अभिनेता अंश दुग्गल हा आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण करणार आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. तसेच तो एका पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत. ते नेहमीच नवनवीन चेहऱ्यांना पडद्यावर आणत असतात.

Delhi Robbery : दिल्लीमध्ये थरारक चोरी! 25 कोटींच्या दागिन्यांची कशी केली चोरी पाहा…

अंशच्या पदार्पणावर आनंद म्हणतात की, आम्ही नेहमी नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतो. त्यात आला अंशची भर पडली आहे. त्याला आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये भूमिका देणार आहोत. तसेच अंश दुग्गल सारखा नवा चेहरा लॉंच करून चित्रपटसृष्टीला एक नवा कलाकार मिळणार आहे. तसेच त्याचं लॉंचिंग आमच्यासाठी कौतुकास्पद आहे.

Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत पूर्ण करणार; महाजनांनी उपोषणकर्त्यांना दिले लेखी पत्र

आनंद एल राय यांचं कलर यलो प्रॉडक्शन्स हे त्यांच्या विविध चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत एक से एक चित्रपट दिले आहेत त्यामध्ये आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा शुभ मंगल सावधान, कंगनाचा तनु वेड्स मनू, दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा रांझणा हे चित्रपट आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून निर्माण झालेले आहेत.

के. अन्नामलाई : तमिळनाडूत भाजपचं अख्ख राजकारण फिरविणारा मोदी-शाहंचा हुकमी एक्का

आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्सच्या आगामी प्रोजेक्ट्बद्दल सांगायचे झाले तर त्यांचे ‘तेरे इश्क में, फिर आयी हसीन दिलरूबा, झिम्मा 2 आणि नुकताच मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचे तुरा रोवणारा आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube