Delhi Robbery : दिल्लीमध्ये थरारक चोरी! 25 कोटींच्या दागिन्यांची कशी केली चोरी पाहा…

Delhi Robbery

Delhi Robbery : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोट्यावधी रूपायांची चोरी झाली आहे. दिल्लीतील जंगपुरा या भागामध्ये उमराव सिंह या नावाचं एक ज्वेलरी शोरूम आहे. तेथे ही तब्बल 20-25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. अशी माहिती या दुकानाचे मालकांनी दिली आहे. या भल्या मोठ्या चोरीमुळे या भागासह दिल्लीत खळबळ माजली आहे.

Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत पूर्ण करणार; महाजनांनी उपोषणकर्त्यांना दिले लेखी पत्र

कशी झाली चोरी?
जंगपुरा मार्केट सोमवारी बंद असतं. त्यामुळे हे दुकान मालक दुकानात आले नव्हते. तर मंगळवारी दुकान उघडताच त्यांना प्रकार दिसला पूर्ण दुकान दरोडेखोरांनी धुवून नेले होते. त्यामुळे दुकान मालकाला मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

के. अन्नामलाई : तमिळनाडूत भाजपचं अख्ख राजकारण फिरविणारा मोदी-शाहंचा हुकमी एक्का

ही चोरी शोरूमच्या टेरेसच्या मार्गाने करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये या बिल्डींगमध्ये अनेक दुकान आहेत. त्यामुळे या शोरूमच्या शेजारी अनेक जीने बनवण्यात आलेले आहेत त्या मार्गे जात या चोरांनी टेरेस फोडले आहे. मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले नाही. तर शोरूमच्या फोडलेल्या टेरेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुमच्याकडे नसले तरी आमच्याकडे रेकॉर्ड्स; आव्हाडांनी पवारांच्या अध्यपदाचा पुरावाच दिला

या घटनेवर शोरूमचे मालक संजीन जैन म्हणाले की, आम्ही रविवारी दुकान बंद केलं सोमवारी सुट्टी असते त्यामुळे थेट मंगळवारी दुकान उघडण्यात आलं. तेव्हा सगळ्या दुकानात माती होती. तसेच स्ट्रॉन्ग रूमची भिंत फोडलेली होती. तब्बल 20-25 कोटींचे दागिने गायब झाले होते. या चोरांनी ते टेरेसच्या मार्गानेच ते चोरले असावेत कारण तेथून खड्डा पाडून ते आत आले. सीसीटिव्ही देखील फोडलेले आहे. या चोरीमुळे या भागासह दिल्लीत खळबळ माजली आहे.

चाळीसाव्या दिवशी आम्हाला आरक्षण हवेच; कारणे सांगू नका, जरांगेंचा सरकारला कडक इशारा

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रोहिणा भागात देखील एका मास्क घातलेल्या व्यक्तीने ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली होती. या चोराने अगोदर या दुकान मालकाला हत्यार दाखवत धमकावलं होतं. त्यानंतर दागिन्यांची पेटी घेऊन पसार झाला होता. ही क्राईम ब्रॅंन्चकडे सोपविन्यात आली आहे.

Tags

follow us