तुमच्याकडे नसले तरी आमच्याकडे रेकॉर्ड्स; आव्हाडांनी पवारांच्या अध्यपदाचा पुरावाच दिला

तुमच्याकडे नसले तरी आमच्याकडे रेकॉर्ड्स; आव्हाडांनी पवारांच्या अध्यपदाचा पुरावाच दिला

Jitendra Aawhad : जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले, शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला असं असताना ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले नाही. असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ नसले तरी आमच्याजवळ रेकॉर्ड आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Waheeda Rehman : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रहमान यांना व्हायचे होते डॉक्टर

तुमच्याजवळ नसले तरी आमच्याजवळ रेकॉर्ड आहेत…

कालच्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेलांच्या यांनी म्हटले होते की, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले नाही. त्यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी थेट कागदपत्र दाखवत चुकीचे ठरवले. ते म्हणाले की, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला आणि जाहीर केलं. असं असताना शरद पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले नाही. असं म्हणणारे प्रफुल्ल पटेल हे अत्यंत चुकीचे आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ नसले तरी आमच्याजवळ रेकॉर्ड आहेत.

तेलुगू ते हिंदी वहिदांचा सुपरहीट प्रवास

पुढे आव्हाड म्हणाले, नागालॅंडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाकडे तेथील सरकारमध्ये सामील होण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगी भाजप कींवा एनडीएमध्ये सामील होण्यासाठी ही परवानगी नव्हती. असं आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर ज्याप्रमाणे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादात न्यायालयाने निर्णय दिला की, आमदार नाही तर मूळ पक्ष महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे मूळ राष्ट्रवादी ही शरद पवार यांची आहे. असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राजकीय जन्म देणाऱ्या बापासमोरून भरलेलं ताट ओढलं…

शरद पवार साहेब यांनी ज्यांना राजकीय जन्म दिला. त्यांनी आपल्या बापासमोरून भरलेलं ताट ओढलं आहे. अशी जहारी टीका अजित पवार गटावर जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुढे आव्हाडांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील त्यांच्या पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावरून टीका केली. ते म्हणाले, या विधानाची दखल घ्यावी अस बावनकुळे व्यक्तिमत्त्व नाही.

मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!

तसेच यावेळी आव्हाडांनी रिझर्व्ह बॅंकेच्या फंडावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड जो आपत्तीच्या काळात वापरला जातो. तो 12 हजार कोटी रुपयांचा फंड कुठे गेला? याचे उत्तर भाजप ने द्यावं. अशा शब्दांत अजित पवार गट आणि भाजपवर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube