Waheeda Rehman : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रहमान यांना व्हायचे होते डॉक्टर

  • Written By: Published:
Waheeda Rehman : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रहमान यांना व्हायचे होते डॉक्टर

Unknow Facts About Waheeda Rehman :  बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. वहिदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहिदा रहमान त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहत असे मात्र, वहिदा यांच्याशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत ज्या चाहत्यांना माहिती नाही.

बारामतीचा शेतकरी ठरला अदानी- पवारांच्या भेटीमागचा ‘मास्टर माइंड’

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 दिवशी तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीत आणि नृत्याची चांगलीच आवड होती. मात्र, संगीत आणि नृत्याची आवड असतानाही वहिदा यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती. परंतु, आर्थिक अडचणींमुळे त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात करावी लागली. वहिदा यांनी दमदार अभिनयाने मनोरंजनसृष्टीमध्ये एक अनोखा स्थान निर्माण केले असून, वहिदा यांना यापूर्वी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

बिग बी अभिताभ बच्चन यांना मारली होती थप्पड

वहिदा रहमान आणि बिंग बींचा एक रंजक अनेकांना माहिती नाहीये. वहिदा यांनी सर्वांचे लाडके बिग बीं अमिताभ बच्चन (Abhitabh Bacchan) यांना थप्पड मारली होती. बिग बी आणि वहिदा ‘रेश्मा और शेरा’ या सिनेमात एकत्र काम करत होते. या सिनेमाच्या शूटिंगच्यादरम्यान वहिदा यांनी अमिताभ बच्चन यांना जोरदार थप्पड मारली होती. ही थप्पड मारण्यापूर्वी वहिदा यांनी बच्चन यांना ‘तयार राहा, मी तुम्हाला जोरदार थप्पड मारणार असल्याचे म्हटले होते. हा चित्रपटाच्या स्क्रिप्टचा भाग होता. मात्र, शूटिंगच्या दरम्यान हे वाक्य खरे ठरले आणि वहिदा यांनी बिग बींच्या गालावर जोरदार थप्पड मारली होती. वहिदा आणि अमिताभ यांच्यासह या चित्रपटात दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनीृदेखील या सिनेमात काम केले होते.

Asian Games : भारतासाठी ‘सुवर्ण’ दिन; तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत मिळवलं ‘गोल्ड’ मेडल

वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. वहिदा रहमान यांना दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वहिदा रहमान यांनी देवानंद यांच्यासोबत सीआयडी चित्रपटात पदार्पण केले आणि त्यानंतर प्यासा, कागज के फूल, गाइड, नील कमल, तीसरी कसम, रंग दे बसंती आणि राम और श्याम सारखे सुपरहिट चित्रपट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube