Asian Games : भारतासाठी ‘सुवर्ण’ दिन; तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत मिळवलं ‘गोल्ड’ मेडल
Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला आहे. आणि याचे कारण म्हणजे घोडेस्वारीत भारताने 41 वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने 1982 नंतर प्रथमच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. Hangzhou Asian Games मध्ये ही घोडेस्वारी स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची आशा तर सोडाच, कोणतेही पदक मिळण्याची शक्यता नव्हती. पण अशा कठिण परिस्थितीत या खेळाडूंनी अपेक्षेपलीकडे जाऊन इतिहास रचला आहे.
भारतासाठी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या घोडेस्वारांमध्ये सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंग, हृदय छेडा आणि अनुष अग्रवला यांच्या नावाचा समावेश आहे. या खेळाडूंनी सुवर्ण जिंकल्यानंतर काही वेळातच भारताने याच खेळाच्या एकाच स्पर्धेत एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदकही पटकावले.
घोडेस्वारीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले
भारताने घोडेस्वारीत 209.205% गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि महिला क्रिकेटमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले होते. घोडेस्वारीच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर याच खेळाच्या एकाच स्पर्धेत अनुष अग्रवालने भारतासाठी रौप्यपदक जिंकले, तर हृदय छेडा याने कांस्यपदक पटकावले.
Bobby Deol: ‘ॲनिमल’च्या निर्मात्यांनी शेअर केला आगामी पात्राचा फोटो
घोडेस्वारीपूर्वी नौकानयनातही 2 पदके जिंकली
घोडेस्वारीपूर्वी भारताने आज नौकानयनात एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. नेमबाजी आणि नंतर ज्युदोमध्ये पदकं जिंकली असती तर भारताची पदक संख्या वाढली असती.
या खेळांमध्ये पदकाची आशा
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसर्या दिवशी अनेक खेळले जात आहेत. भारताने यात पदक जिंकले नाही, पण कामगिरी चांगली राहिली आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताने सिंगापूरचा 16-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. स्क्वॉशमध्ये महिला खेळाडूंनी पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. स्क्वॉशच्या पुरुष गटातही भारताने 3-0 असा विजय मिळवला. सर्वांच्या नजरा व्हॉलीबॉल खेळावर असतील, जिथे भारताचा पाचव्या स्थानासाठी पाकिस्तानशी सामना होणार आहे.