बारामतीचा शेतकरी ठरला अदानी- पवारांच्या भेटीमागचा ‘मास्टर माइंड’
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी (Gautam Adanai) यांनी नुकताच अहमदाबाद येथे गौतम अदानींच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर अदानी आणि पवारांचा एकत्र फोटो समोर आला होता. दोघांच्या एकत्रित फोटोची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली होती. मात्र, आता अदानी आणि पवारांच्या या भेटीमागे बारामतीचं कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. स्वतः शरद पवारांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sharad Pawar On Gautam Adani Meet’s)
महिला आरक्षणाचे निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतले, हे पंतप्रधानांना माहिती दिसत नाही; पवारांचा टोला
प्रकल्प अदानींचा आणि कनेक्शन बारामतीचं?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अहमदाबादमध्ये पवारांनी उद्घाटन केलेला प्रकल्प गौतम अदानींचा आहे आणि कनेक्शन बारामतीचं कसं? याच खुलासाही पवारांनी केला आहे. पवार म्हणाले की, मी अदानींनी सुरू केलल्या नव्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला गेलो होतो ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. ज्या प्रॉडक्टचं उत्पादन या कारखान्यात केले जाणार आहे ते प्रॉडक्ट बारामतीच्या शेतकऱ्याने तयार केले असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
अहमदाबाद जवळ एका औद्योगिक वसाहतीत हा छोटासा कारखाना असून, त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. गाय जेव्हा वासराला जन्म देते त्यावेळी पहिल्या दोन दिवसात जे दूध असते त्याला आपण चीक असे म्हणतो. याच चीकापासून या शेतकरी कुटुंबाने सखोल अभ्यासकरून हे खास प्रॉडक्ट तयार केले आहे. हे प्रोडक्ट दररोज साधारण दोन ते तीन महिने घेतल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Manmohan Singh : पटेल यांचा एक नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…
देशभरात कुठेही अशा पद्धतीने न मिळणारे प्रॉडक्ट बारामतीतील एका खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने तयार केले आहे. या कार्यक्रमाला संबंधित शेतकऱ्याने अदानींनी अध्यक्ष तर, मला उद्घाटक म्हणून बोलावले होते, असे पवारांनी यावेळी सांगितले. त्याला प्रोत्साहन आणि शाबासकी देण्यासाठी आपण आनंदाने गेल्याचे पवार म्हणाले. अशा प्रकारचे वेगळे उत्पादन तयार होत असतील तर, त्याच्या उद्घाटनाला मी आनंदाने जाईल असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.