चाळीसाव्या दिवशी आम्हाला आरक्षण हवेच; कारणे सांगू नका, जरांगेंचा सरकारला कडक इशारा

  • Written By: Published:
चाळीसाव्या दिवशी आम्हाला आरक्षण हवेच; कारणे सांगू नका, जरांगेंचा सरकारला कडक इशारा

जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र आंदोलन केले आहे. आरक्षणासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. त्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. परंतु त्यानंतर साखळी उपोषण सुरू आहेत. आता मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकाराला आणखी एक कडक इशारा दिला आहे. सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. आम्ही चाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे सरकारने काहीही करून आम्हाला चाळीसाव्या दिवशी आरक्षण द्यायचे आहे. ते कसे द्यायचे ते सरकारने ठरवावे, कारणे सांगू नये, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.


मोदी-शाहंचे दुसरे फडणवीस! भाजपने तमिळनाडूत मित्राला सोडलं पण ‘के. अन्नामलाई’ म्हणतील तेच केलं!

महसूल प्रशासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाचे 65 लाख अभिलेख तपासले आहे. त्यात पाच हजार अभिलेखावर कुणबी असा उल्लेख आढळला आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले, पाच हजार अभिलेखावर कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे हा एक पुरावा आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळाले पाहिजे. हा पुरावा भरपूर झाला आहे. मी पहिल्यापासून सांगतो एकही आधाराचे गरज नाही. सरकारच्या 2004 च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येते.

आरक्षण समितीच्या अहवालासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. आता पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कसे आरक्षण द्यायचे ते सरकारने ठरवावे. चाळीसाव्या दिवशी आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे. मागणीवर ठाम आहोत. कोणतीही कारणे सांगू नका. मुळात मराठा आरक्षणासाठी समितीच नको होती. 2004 शासन निर्णयानुसार काही प्रश्न सुटणार होते. परंतु आता सरकारला वेळ दिला आहे. त्यामुळे सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, असेही जरांगे म्हणाले.

बारामतीचा शेतकरी ठरला अदानी- पवारांच्या भेटीमागचा ‘मास्टर माइंड’

कायद्याच्या हुलकाविण्या नकोत
हे आरक्षण कायदेशीर टिकणार नाही, असे अनेकांची म्हणणे आहे, यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, राणे समितीही कायदेशीर होती. त्यामुळे आम्हाला कायद्याच्या हुलकविण्या नकोत. अनेक जण म्हणतात आंदोलनांमुळे मराठा समाजाचे नुकसान होते. गुन्हे दाखल होतात. पण मी म्हणतो कोणतेही नुकसान होण्याची बाकी राहिले आहेत. कायदेशीर लढाई कोर्टात गेल्यात दोन-चार पिढ्यांचा आणखी कार्यक्रम होईल. मराठ्यांचे सगळे वाटोळे झाले आहेत, असेही जरांगे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube