Come Fall in Love – DDLJ Musical : भारतीय रंगांचा सण होळीच्या निमित्ताने,कम फॉल इन लव – डीडीएलजे म्यूजिकल या आगामी संगीतमय नाटकातील प्रमुख भूमिकेत झळकणाऱ्या जेना पंड्या आणि अॅशली डे यांचा एक नवा, रंगीबेरंगी फोटो आज प्रदर्शित करण्यात आला. हे संगीतमय नाटक भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) वर आधारित आहे आणि युकेमध्ये मँचेस्टर ओपेरा हाऊस येथे 29 मे ते 21 जून 2025 दरम्यान सादर होणार आहे.
या नाटकाचा प्रेस प्रीमियर 4 जूनला होणार आहे. यंदा प्रेम, नवजीवन आणि चांगल्याच्या विजयाचा सण म्हणजेच होळी यंदा 14 मार्च रोजी साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा नवीन फोटो प्रदर्शित करण्यात आला असून तो या नाटकाच्या रोमँटिक आणि उत्साही वातावरणाची झलक दाखवतो. “,कम फॉल इन लव – डीडीएलजे म्यूजिकल” मधील मुख्य मेसेज म्हणजे प्रेमाला सीमा नसतात, संस्कृती एकत्र आणण्याची ताकद त्यामध्ये आहे आणि हेच होळीच्या उत्सवाशी मिळते जुळते आहे. त्यामुळे हा फोटो या प्रेमकथेला वाहिलेली एक सुंदर ट्रिब्यूट दिला आहे.
या वेळी जेना पंड्या म्हणाल्या की, DDLJ मधील आयकॉनिक सिमरनची भूमिका रंगमंचावर साकारण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हा संगीतमय नाटक भारताच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव साजरा करत आहे. लोकप्रिय संस्कृतीत दक्षिण आशियाई लोकांचा ठसा उमटवण्याच्या या ऐतिहासिक टप्प्याचा भाग होण्याचा मला अभिमान वाटतो. आमच्या नाटकाचा मुख्य गाभा सर्वसमावेशकता, बदल स्वीकारणे आणि प्रेम साजरे करणे हाच आहे. होळी हा सण समाजाला एकत्र आणतो आणि ‘,कम फॉल इन लव ’ च्या मुख्य संकल्पनेशी तो अगदी सुसंगत आहे. होळी या नाटकाच्या कथानकाचा देखील एक भाग आहे, जो उबदारपणा आणि ऐक्य यांचा मेसेज देतो.
अॅशली डे म्हणाले की, मी ‘,कम फॉल इन लव मध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय आणि दक्षिण आशियाई संस्कृतीशी जोडला गेलो आहे आणि यासाठी मी खूप उत्साहित आहे. होळी हा लोकांना एकत्र आणणारा सण आहे, आणि आमच्या नाटकाचा मुख्य विषयही तोच आहे. याशिवाय, हवा आणि एकमेकांवर चमकदार रंग उधळण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे यूके आणि जगभरातील सर्वांना होळीच्या शुभेच्छा!
प्रमुख कलाकार आणि क्रिएटिव्ह टीम
जेना पंड्या यांनी नुकतेच भंगड़ा नेशन या संगीतमय नाटकात मुख्य भूमिका साकारली. याआधी त्यांनी मम्मा मियामध्ये सोफीची भूमिका केली होती. तर अॅशली डे हे यूके आणि अमेरिकेतील नावाजलेले अभिनेता, गायक आणि नर्तक आहेत. त्यांनी डायनेस्टी (नेटफ्लिक्स ) मध्ये कोलिन मॅकनॉटन ही भूमिका साकारली असून अन अमेरिकन इन पेरिस , वाइट क्रिसमस , फनी गर्ल यांसारख्या अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये काम केले आहे. ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ ही कथा ब्रिटन आणि भारताच्या पार्श्वभूमीवर घडते, आणि तिचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा करत आहेत. त्यांनीच ऐतिहासिक ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) चे दिग्दर्शन केले होते.
हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा चित्रपट आहे आणि 1995 मध्ये प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत मुंबईतील एका थिएटरमध्ये सलग दाखवला जात आहे. या स्टेज म्युझिकलमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या अजरामर प्रेमकथेचे नव्या रूपात सादरीकरण केले जाईल, ज्यामध्ये 18 नवीन इंग्रजी गाण्यांच्या ठेक्यावर विविध संस्कृतींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळेल.
पुरस्कारप्राप्त क्रिएटिव्ह टीम
या भव्य संगीतमय नाटकासाठी एक प्रतिभावान आणि प्रतिष्ठित क्रिएटिव्ह टीम सज्ज आहे:
पटकथा आणि गीते: नेल बेंजामिन (*‘मीन गर्ल्स’ टिना फे यांच्यासोबत, ‘लीगली ब्लाँड’ साठी ओलिव्हियर पुरस्कार विजेते)
संगीत: विशाल ददलानी आणि शेखर रवजियानी (भारतात विशाल-शेखर नावाने प्रसिद्ध)
नृत्य दिग्दर्शन: रॉब ऐशफोर्ड (टोनी, ओलिव्हियर आणि एमी पुरस्कार विजेते – ‘Frozen, Cat on a Hot Tin Roof, How to Succeed in Business Without Really Trying’)
भारतीय नृत्य सह-नृत्यदिग्दर्शक: श्रुती मर्चंट (‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘ताज एक्सप्रेस’)
मंच रचना: डेरेक मॅकलेन (Tony Award विजेते – ‘MJ the Musical’, ‘Moulin Rouge! The Musical’)
कास्टिंग: डेव्हिड ग्राइंड्रॉड CDG (Grindrod Burton Casting)
प्रकाशयोजना: जैफी वेडमॅन ध्वनी
संयोजन: टोनी गेल
व्हिडिओ डिझाइन: अखिला कृष्णन
संगीत पर्यवेक्षक आणि अॅरेजर: टेड आर्थर
संगीत दिग्दर्शक: बेन होल्डर
… तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल
या नाटकाच्या अधिकृत कास्टिंगची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. जागतिक प्रीमियर ‘कम फॉल इन लव्ह – द DDLJ म्युझिकल’ चा जागतिक प्रीमियर 2022 मध्ये ‘द ओल्ड ग्लोब’, सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे झाला होता.