‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या प्रमुख जोडीने युके प्रीमियरपूर्वी घेतले गुरुद्वाऱ्यात आशीर्वाद

‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या प्रमुख जोडीने युके प्रीमियरपूर्वी घेतले गुरुद्वाऱ्यात आशीर्वाद

Come Fall in Love – The DDLJ Musical : ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या युके प्रीमियरसाठी उत्सुकता वाढत असताना, शोमधील मुख्य कलाकार जेना पांड्या आणि अ‍ॅश्ले डे यांनी बैसाखीच्या पवित्र दिवशी साउथॉल गुरुद्वाऱ्यात जाऊन आशीर्वाद घेतला. सिमरन आणि रॉग यांच्या भूमिकेत असलेल्या या जोडीने त्यांच्या प्रवासाची सुरुवात अध्यात्मिक आशिर्वाद घेत केली आणि या ईस्ट-मीट्स-वेस्ट लव्ह स्टोरीला सांस्कृतिक सौहार्दाची सुरुवात दिली.

ही इंग्रजी भाषेतील भव्य म्युझिकल आहे, जी 1995 मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या अजरामर चित्रपटावर आधारित आहे. या म्युझिकलचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले असून निर्मिती यशराज फिल्म्सची आहे. ब्रॉडवेची भव्यता आणि बॉलिवूडची हृदयस्पर्शी कथा एकत्र करत हे नाट्य 29 मे ते 21 जून 2025 दरम्यान मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये होणार आहे. प्रेस नाईट 4 जून रोजी होईल.

भारत आणि युकेमध्ये सेट झालेली ही कथा 18 नवीन इंग्रजी गाण्यांसह सादर केली जात आहे. गाणी संगीतकार विशाल-शेखर (विशाल डडलानी आणि शेखर रवजियानी) यांनी दिली आहेत. नेल बेंजामिन यांनी गीत आणि संवाद लिहिले असून, रॉब अशफोर्ड यांची कोरियोग्राफी आहे. भारतीय नृत्यसंचाची को-कोरियोग्राफी श्रुति मर्चंट यांनी केली आहे.

प्रमुख कलाकार:

सिमरन – जेना पांड्या

रॉग – अ‍ॅश्ले डे

बलदेव – इर्विन इक्बाल

मिंकी – कारा लेन

लज्जो – हरवीन मान-नीरी

बेन – अमोनिक मेलाको

कुकी – मिली ओ’कॉनेल

अजीत – अंकुर सभरवाल

कुलजीत – किंशुक सेन

रॉग सीनियर – रसेल विलकॉक्स

एंसेम्बल कलाकार

एरिका-जेन एल्डन, टॅश बाकरसे-हॅमिल्टन, स्कार्लेट बेहल, सोफी कॅम्बल, गैब्रिएल कोका, रोहन धूपर, जो डजॅंगो, अलेक्झांडर एमरी, कुलदीप गोस्वामी, एला ग्रँट, यास्मिन हॅरिसन, मोहित माथुर, टॉम मसल, पूर्वी परमार, साज राजा, मनु सर्सवत, गॅरेट टेनंट, सोन्या वेणुगोपाल

स्विंग्स

एमिली गुडइनफ, मरीना लॉरेन्स-माहरा, जॉर्डन माईसुरिया-वेक

सर्जनात्मक टीम

पुस्तक आणि गीत: नेल बेंजामिन

संगीत: विशाल डडलानी आणि शेखर रवजियानी

दिग्दर्शक: आदित्य चोप्रा

कोरियोग्राफी: रॉब अशफोर्ड

सह-कोरियोग्राफर (भारतीय नृत्य): श्रुति मर्चंट

दृश्य डिझाइन: डेरेक मॅक्लेन

लाईटिंग डिझाइन: जॅफी वेइडमन

साउंड डिझाइन: टोनी गायल

व्हिडिओ डिझाइन: अखिला कृष्णन

म्युझिकल सुपरव्हिजन व अरेंजमेंट: टेड आर्थर

मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न

म्युझिकल डायरेक्टर: बेन होल्डर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube