Taapsee Pannu विरोधात तक्रार दाखल; सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप

Taapsee Pannu :  बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसी पन्नू हिच्यावर सनातन हिंदू धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदौर पोलिस अधिकचा तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तापसी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते आहे. आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी याआधीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात […]

Taapsee Pannu

Taapsee Pannu

Taapsee Pannu :  बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसी पन्नू हिच्यावर सनातन हिंदू धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदौर पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून तापसी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते आहे. आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी याआधीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणींना कोरोनाची लागण

मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसीवर सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी इंदूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छत्रीपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलव्य गौर नामक व्यक्तीने तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्या व्यक्तीने तापसीने सनातन धर्माचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.”

नेमकं प्रकरण काय? 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना खूप बोल्ड ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने लक्ष्मी देवीचा फोटो असलेलं लॉकेटही घातलं होतं. तापसीच्या या वागणुकीमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या असून त्यांनी तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार

Exit mobile version