Download App

Drug Case प्रकरणात भारती सिंग अन् नवरा हर्षला मोठा दिलासा, नेमकं प्रकरण जाणून घ्या?

Bharti Singh- Harsh Limbachiya :

कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) यांना ड्रग प्रकरणामध्ये (Drug Case) मोठा दिलासा मिळाला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारती – हर्षला मिळालेला जामीन रद्द करण्याची याचिका केली होती. परंतु ते दोघे देखील जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन करत नाहीत, असे म्हणतं विशेष एनडीपीएस न्यायालयाने (NDPS Court) त्यांचा जामीन रद्द करण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची याचिका फेटाळली आहे.


भारती आणि हर्षच्या घरी आणि कार्यालयामध्ये गांजा सापडल्याने या रोमँटिक जोडप्याला नोव्हेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. एनसीबीने युक्तिवाद केला की त्याच्या वकिलाचे ऐकल्याशिवाय जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु न्यायालयाकडून सांगण्यात आले होते की, सुनावणीला उपस्थित न राहणे ही एजन्सीची चूक आहे आणि जामीन रद्द करण्याचे कोणतेही कारण नव्हते.

विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या आठवड्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. ज्यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना देण्यात आले असलेला जामीन रद्द करण्यात आला आणि या कपलने  कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे सांगण्यात आले आहे. एनसीबीने 21 नोव्हेंबर 2020 रोजी भारती सिंग आणि तिच्या नवऱ्याच्या घरी आणि उत्पादन गृहावर छापे मारत असताना 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

23 नोव्हेंबर रोजी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. तसेच एनसीबीने 31 डिसेंबर रोजी जामिनाला आव्हान देणारी याचिका विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार की, 22 नोव्हेंबर 2020 रोजी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एनसीबीला बोलावण्यात आले होते.

परंतु त्यावेळेस एजन्सीच्या वतीने कोणी देखील हजर झाले नाही. आणि 23 नोव्हेंबर रोजी न्यायालयात फिर्यादी किंवा तपास अधिकारी हजर नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. यामुळे एजन्सीची चुक असल्याने भारती आणि हर्षचा जामिन नामंजुर करण्याचा कोणताही संबंध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us