Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा फिटनेस आणि लाईफस्टाईलमुळं ते नेहमीच चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले, पण एका वेगळ्याच कारणांमुळं. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत व्यक्तिमत्व हक्कांशी संबंधित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे नाव, आवाज आणि चित्र वापरण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी बंदी घातली.
वैयक्तिक सुरक्षेसाठी अनिल कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत विविध संस्थांकडे त्यांच्या संमतीशिवाय त्याचे नाव एके, आवाज, फोटो आणि टोपणनाव इत्यादी वापरण्याचे पेटंट असल्याचा आरोप करण्यात आला होती. या प्रकरणाची न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठाने बुधवारी विविध संस्थांना अभिनेता अनिल कपूर यांचे नाव, प्रतिमा आणि आवाज यांचा व्यावसायिक कारणांसाठी त्यांच्या संमतीशिवाय वापर करण्यास मनाई केली. त्यांचे नाव, आवाज, संवाद आणि प्रतिमा बेकायदेशीरपणे वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं खंडपीठीने नमूद केलं.
दिल्ली उच्च न्यायालयाने गो डॅडी एलएलसी, डायनाडॉट एलएलसी आणि पीडीआर लिमिटेड यांना अनिल कपूर यांच्या नावावर असलेले Anilkapoor.com सारखे डोमेन त्वरित ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
ICC Ranking मध्ये मोहम्मद सिराजची गरुडझेप, सिराज बनला वर्ल्ड नंबर वन…
याबद्दल बोलकांना अनिल कपूर यांनी सांगितले की, माझे व्यक्तिमत्व हेच माझे आयुष्य आहे आणि ते घडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. या खटल्याद्वारे, मी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून संरक्षण करत आहे. याबाबत माझे वकील अमित नाईक यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने सविस्तर सुनावणीनंतर माझे व्यक्तिमत्व अधिकार मान्य करणारा आदेश मंजूर केला आहे आणि सर्व गुन्हेगारांना माझ्या परवानगीशिवाय माझे नाव, प्रतिमा, समानता, आवाज इत्यादींसह माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्मांचा कृत्रिम बुद्धिमत्ता, खोल बनावट, GIF यासह कोणत्याही प्रकारे गैरवापर करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. माझा हेतू कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याचा किंवा कोणाला दंड करण्याचा नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी जारी केलेल्या निर्णयानुसार अनिल कपूर यांचे नाव, उपमा, आवाज किंवा त्याच्या ओळखीचे कोणतेही वैशिष्ट्य आयटम, रिंगटोन किंवा इतर उत्पादने तयार करण्यासाठी कोणीही वापरू शकत नाही.
अनिल कपूर हे गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या. आता ते लवकरच भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ‘थँक यू फॉर कमिंग’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरने केली आहे.