Download App

Deepak Tijori : ‘आशिकी’ फेम दीपक तिजोरीला 2.6 कोटींना गंडवलं, मुंबईत FIR दाखल

  • Written By: Last Updated:

Deepak Tijori News : बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत (Deepak Tijori) कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘आशिकी’ यासारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवलेल्या दीपक तिजोरीने याप्रकरणी त्याचे सहनिर्माते मोहन नाडर (Mohan Nadar) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. याच दीपकने मोहन नाडर यांनी 2.6 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेन वृत्त प्रकाशित केले आहे.

प्रकाशित वृत्तनुसार आंबोली पोलीस ठाण्यात दीपक तिजोरी यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दीपक तिजोरी यांनी मोहन नाडरकडून पैसे न मिळाल्याने 10 दिवसांपूर्वी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. हे पैसे शूट लोकेशनसाठी वापरण्याच्या बहाण्याने मोहन नाडरने 2.6 कोटी रुपये हडप केल्याचे बोलले जात आहे. दीपक तिजोरी आणि मोहन नाडर यांनी 2019 मध्ये ‘टिप्सी’ चित्रपटासाठी करार केला होता. त्यानंतर दीपक तिजोरीकडून 2.6 कोटी रुपये घेऊनही हा चित्रपट पूर्ण न केल्याचा आरोप आहे.

Corona Update : राज्याची चिंता वाढली, कोरोना रूग्णांमध्ये तब्बल ‘एवढी’ वाढ

तक्रारीत नेमकं काय?

अभिनेता दीपक तिजोरीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘लंडनमधील लोकेशनचे पैसे देण्यासाठी मोहन नाडरने सप्टेंबर 2019 मध्ये पैसे घेतले होते. परत देण्याचे आश्वासनाच्या आधारावर हे पैसे देण्यात आले होते. पैसे मागितल्यानंतर यासाठी देण्यात आलेले चेक बाऊन्स होत राहिल्याचे दीपकने तक्रारीत नमुद केले आहे.

दीपक तिजोरीने 1990 मध्ये महेश भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’, ‘कभी हान कभी ना’, ‘बादशाह’, ‘वास्तव’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ आणि ‘राजा नटवरलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे. अभिनयासोबतच दीपक तिजोरीने यापूर्वी ‘उप्स’, ‘फरेब’, ‘फॉक्स’ आणि ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

Tags

follow us