Deepika Padukone’s Selfie: दीपिकाची कुटुंबासोबत भूतान भटकंती; चाहत्यांसोबत क्लिक केले सेल्फी

Deepika Padukone’s Selfie: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या कुटुंबाबरोबर भूतान ट्रीपवर आहे. दीपिकाने भूतानमधील (Bhutan) काही ठिकाणी भेट दिली आहे. या ट्रीपचे काही फोटो दीपिकाच्या फॅन पेजने सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) शेअर केले आहेत. काही फोटोमध्ये दीपिका आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेत असल्याचे देखील दिसत आहे. दीपिकाने भूतानच्या युअर कॅफे उपहारगृहाला भेट दिली होती. या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out

Deepika Padukone's Selfie

Deepika Padukone’s Selfie: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या कुटुंबाबरोबर भूतान ट्रीपवर आहे. दीपिकाने भूतानमधील (Bhutan) काही ठिकाणी भेट दिली आहे. या ट्रीपचे काही फोटो दीपिकाच्या फॅन पेजने सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) शेअर केले आहेत. काही फोटोमध्ये दीपिका आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेत असल्याचे देखील दिसत आहे.

दीपिकाने भूतानच्या युअर कॅफे उपहारगृहाला भेट दिली होती. या उपहारगृहाच्या इन्स्टाग्राम पेजवर दीपिकाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये दीपिका ही उपहारगृहाच्या स्टाफबरोबर दिसून आली आहे. ‘तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व्ह करण्याची संधी मला मिळाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.


mrajasegaran नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि तिची एक फॅन दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘मी तिच्या प्रायव्हसीचा आदर केला. जेव्हा ती एका फोटोकरिता तयार होती, तेव्हा ती माझ्याकडे आली आणि फोटो काढला. ती स्क्रीनवर जेवढी छान आहे तेवढीच ऑफ स्क्रीन देखील मस्त असते.


दीपिकाचे चित्रपट

जानेवारी महिन्यामध्ये प्रदर्शित झालेला दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. चित्रपटाने वर्ल्डवाइड १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करत मोठा इतिहास रचला आहे. आता दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तसेच तिच्याकडे प्रभासबरोबरचा ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘द इंटर्न’ हे चित्रपटही आहेत. ‘प्रोजेक्ट के’मध्ये दीपिका अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Exit mobile version