Download App

Sushantच्या जीवनावरील सिनेमावर बंदी? अन् कोर्टाने दिला नकार; जाणून घ्या काय प्रकरण

Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) जीवनावर बनलेल्या ‘न्याय’ या सिनेमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळण्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याचे वडील कृष्णा किशोर सिंह (Krishna Kishore Singh) यांनी या सिनेमावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. (New Cinema) त्यावर आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांची याचिका फेटाळली आहे. याचिकेमध्ये अभिनेत्याच्या वडिलांनी दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘न्याय: द जस्टिस’ हा सिनेमा प्रसारित केला जाणार आहे. त्यामध्ये बदनामीकारक विधानं आणि बातम्या देखील आहेत. तसेच हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात येत आहेत, म्हणून त्याच्या स्ट्रीमिंगवर बंदी घालायची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी हा सिनेमा बघितला आहे. आणि ते म्हणाले, “हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे , आणि त्याची बदनामी करणारा असला तरी हे त्याचे वैयक्कित जीवन होते. जे त्याच्या मृत्यूनंतर राहिले नाही. ते अधिकार सुशांतचे होते. यामुळे ते अधिकार त्याच्या वडिलांना देत येणार नाही. तसेच या अधिकारांबद्दल सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालता येणार नाही. या सिनेमात दाखवण्यात आलेली काही गोष्ट सार्वजनिक केली जाईल, ही सर्व माहिती मीडियाद्वारे दाखवली जात असताना सुशांतच्या वडिलांनी त्यावर कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

यामुळे मिळालेल्या माहितीचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले होते, म्हणून निर्मात्यांनी ना सुशांतच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे ना त्याचे वडील केके सिंह , असंही न्यायमूर्ती हरिशंकर यांनी नमूद करून घेतले आहे. या सिनेमात लपलाप या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. आतापर्यंत या सिनेमाला हजारो लोकांनी बघितला असेल. मग त्यावर बंदी घालण्याचा काय फायदा असे देखील कोर्टाने यावेळी सांगितले आहे. दरम्यान ३४ वर्षीय सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा आजून देखील तपास चालू असल्याचा सांगण्यात येत आहे.

Tags

follow us