Download App

Aaradhya Bachchan हिच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने गूगल, यूट्यूबला बजावलं समन्स

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या (Aaradhya Bachchan) संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. फेक न्यूजविरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली होती.


जस्टिस सी हरि शंकर यांच्या पीठाने आराध्या बच्चन हिच्यासंबंधी वेगवेगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून (YouTube platform) सुरु असलेल्या खोट्या बातम्या काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या खोट्या बाम्या शेअर केल्या जाऊ नयेत, असं कोर्टाने सांगितले आहे. याचिकेत गूगल आणि यूट्यूबला पक्षकार बनवण्यात आलं होतं. या दोन्ही कंपन्यांना कोर्टाने समन्स जारी करण्यात आला आहे.

नेमकं कोर्टाने काय म्हटलं?

कोर्टाने यासंदर्भात युट्यूब व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणावर न्यायाधीश म्हणाले, प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये, याची जबाबदारी युट्यूबने घ्यावी, मिस वर्ल्डचा किताब भूषवणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हिच्या आजाराविषयीच्या अफवांमुळे बच्चन कुटुंबीय नाराज होते.

IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी

त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यामुळे ११ वर्षांच्या आराध्याच्या वतीने दिल्ली हायकोर्टात खोट्या बातम्यांविरोधामध्ये बॉलिवूड टाइम्ससह इतर अनेक युट्यूब चॅनलविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

Tags

follow us