Download App

पराग देसाई मृत्यू : अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?

Parag Desai death case : अहमदाबाद : वाघ बकरी चहा समुहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच या प्रकरणी अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान यांनी ही मागणी केली आहे. (Demand to file a case against actor John Abraham in Parag Desai death case)

नेमकं काय म्हणाले कमाल राशिद खान?

‘पराग यांच्या कुटुंबाने जॉन अब्राहम आणि रस्त्यावरील कुत्र्यांना वाचवण्यासाठी मोहीम चालवणाऱ्या इतर सर्व मूर्खांविरुद्ध एफआयआर दाखल करावी. अशी पोस्ट कमाल राशिद खान यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. यापैकी काही लोक त्यांना सपोर्ट करत आहेत तर काही त्यांना विरोध करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “कुत्र्यांवर प्रेम करणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र भटक्या कुत्र्यांमुळे या वाढत्या घटना अतिशय भीतीदायक आहेत. तर दुसर्‍याने लिहिले, “कुत्र्यांपेक्षा माणसेच जास्त नुकसान करतात, मग माणसांनाही रस्त्यावर फिरण्यापासून रोखले पाहिजे.”

https://twitter.com/kamaalrkhan/status/1716727677388820491

जॉन अब्राहमला कुत्र्यांचा शौक आहे

बॉलीवूडचा फिटनेस फ्रीक जॉन अब्राहम हा प्राणीप्रेमी आहे. तो अनेकदा रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोहीम राबवतो. जॉनने रस्त्यावरच्या अनेक कुत्र्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. यापूर्वी अनेकदा तो मुंबईच्या रस्त्यांवर कुत्र्यांसाठी मोहिम राबवताना दिसून आला आहे. मात्र त्याच्या याच कृतीमुळे तो आता वादात सापडला आहे.

Animal : टाइम्स स्क्वेअरवर झळकला अ‍ॅनिमल; टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध

कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले

पराग देसाई हे गेल्या आठवड्यात (15 ऑक्टोबर) मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तेव्हा अचानक त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला आणि कुत्र्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना ते जमिनीवर पडले. कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या शेल्बी रुग्णालयात नेण्यात आले. एक दिवसाच्या निरीक्षणानंतर, त्यांना शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान केले.

एएनआयनुसार शेल्बी हॉस्पिटल्सने एका प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की पराग देसाई यांना संध्याकाळी 6 च्या सुमारास आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. ते बेशुद्ध होते आणि उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर पराग देसाई खाली पडले असे सांगण्यात आले परंतु त्यांच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. सीटी स्कॅनमध्ये फ्रंटल कॉन्ट्युशनसह तीव्र सबड्यूरल हेमेटोमा दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांत कुत्रा चावल्यामुळे किंवा भटक्या प्राण्यांमुळे झालेल्या अपघातांचे बरेच प्रकरणे समोर येत आहेत.

Tags

follow us