Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट

Saif Ali Khan Devara First Look: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने देखील (Karina Kapoor) सैफबरोबरचा एक रोमँटिक फोटो (Romantic photos) शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे बघायला […]

Saif Ali Khan Devara First Look

Saif Ali Khan Devara First Look

Saif Ali Khan Devara First Look: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने देखील (Karina Kapoor) सैफबरोबरचा एक रोमँटिक फोटो (Romantic photos) शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे बघायला मिळालं आहे.

तसेच सैफच्या आगामी ‘देवरा’ (Devara) या सिनेमाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. वाढदिवशी फर्स्ट लूक प्रदर्शित करत अभिनेत्याने चाहत्यांना खास भेट दिल्याचे बघायला मिळालं आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सैफ अली खानचे लांब केस आणि हटके लूक बघायला मिळत आहे. याबरोबरच त्याच्या या पात्राचे नाव देखील समोर आले आहे. या सिनेमात सैफ अली खान ‘भैरा’ची भूमिका साकारणार आहे.

त्याचा फर्स्ट लूक खूपच हटके आहे. या सिनेमाची कथा काय राहणार आहे, हे आजून देखील गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांचे केवळ फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील या सिनेमाद्वारे साऊथमध्ये हटके एन्ट्री करणार आहे. अभिनेता सैफ अली खान त्याच्या अनेक हटक्या पात्रांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. तो सध्या त्याच्या अशाच काही भूमिकांमुळे कायम चर्चेत येत असतो.

Welcome 3 Announcement: ‘OMG 2’नंतर खिलाडीच्या आगामी सिनेमाची घोषणा; रिलीजची तारीख आउट

‘ओंकारा’पासून ते ‘तांडव’च्या स्वार्थी राजकारण्यापर्यंत सैफने कायम प्रत्येक भूमिकेमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत. ‘देवरा’मधील त्याचा लूक बघून देखील चाहत्यांची मोठी उत्सुकता लागली आहे. यामुळे या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागल्याचे दिसत आहे. ‘देवरा’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. ‘देवरा’ या सिनेमात ज्युनियर एनटीआर हा मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. तर अभिनेत्री जान्हवी कपूर देखील हटक्या अंदाजात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

Exit mobile version