‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; अवघ्या तीन दिवसांत ‘एवढे’ कमावले!

धमाल 4 या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 67.21 कोटी रुपये इतके झाले आहे.

Dhamal 4

Dhamal 4

Dhamaal 4 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘धमाल 4’ची जोरदार कमाई सुरूच आहे. अजय देवगण (Ajay Devgn), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि जावेद जाफरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘धमाल 4’ (Dhamaal 4) या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

Dhamaal 4 ची बॉक्स ऑफिसवर धूम! दुसऱ्या दिवशी 50% वाढ, दोन दिवसांत 38.81 कोटींची कमाई

दमदार सुरुवातीसह दुसऱ्या दिवशीही कमाईच्या बाबतीत आपली पकड कायम राखल्यानंतर, या चित्रपटाने पहिल्या रविवारी कमाईच्या बाबतीत जबरदस्त वेग पकडला आणि 28.40 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली. यासह, अवघ्या तीन दिवसांत धमाल 4 या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 67.21 कोटी रुपये इतके झाले आहे.
विकेंडच्या (सुट्टीच्या दिवसांच्या) माहोलमुळे कौटुंबिक प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळत आहेत. ‘धमाल 4’ला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपट यशाच्या शिखरावर आहे.

Frame Movie : ‘फ्रेम’मधलं अन् त्या पलीकडचं… बरंच काही…

धमाल चित्रपटाच्या फ्रँचायझीची ताकद आणि धमाल’ गँग – विशेषतः ‘आदी-मानव’ या लोकप्रिय जोडीशी प्रेक्षकांचे असलेले घट्ट नाते यामुळे हा चित्रपट आगामी आठवड्यात आणखी चांगली कामगिरी करेल अशी चिन्हे दिसत आहेत. तसेच आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात अवघ्या तीन दिवसांत तब्बल 92 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

उगवण झाली नाही अन् दुबार पेरणीतही निघालं सडलेलं बियाणं; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

‘धमाल 4’ हे गुलशन कुमार आणि टी-सीरीज (T-Series) द्वारे प्रस्तुत असून, ही देवगण फिल्म्स (Devgn Films), टी-सीरीज फिल्म्स, मारुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज यांची निर्मिती आहे. ‘धमाल 4’चे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे, तर अजय देवगण, भूषण कुमार आणि कृष्णन यांनी याची निर्मिती केली आहे.

Exit mobile version