‘Dhamaal 4s song ‘Chutney’ has been released, adding a Bhojpuri twist to the fun : खळखळून हसवणाऱ्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना जुन्या आठवणींच्या सफरीवर घेऊन गेलेल्या धमाल 4 ने आता उत्साहाची पातळी आणखी उंचावली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच ‘चटणी’ हे जोशपूर्ण गाणे प्रदर्शित केले असून, भोजपुरी संगीताचा दमदार ठेका आणि धमाल फ्रँचायझीची भन्नाट मस्ती यांचा अफलातून संगम या गाण्यात पाहायला मिळतो.
“फुलौरी बिना चटणी कैसे बनी” या लोकप्रिय ओळींवर आधारित असलेले हे गाणे आकर्षक संगीत, दमदार बीट्स आणि नाचायला भाग पाडणाऱ्या तालांनी सजलेले आहे. चित्रपटातील विनोद, गोंधळ आणि धमाल वातावरणाशी हे गाणे उत्तम प्रकारे जुळून येते. गाण्यात अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अंजली आनंद आणि रवि किशन यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. विशेष म्हणजे रवि किशन यांनी आपल्या खास भोजपुरी अंदाजाने गाण्याला वेगळीच रंगत आणली आहे.
“स्वप्न सुंदरी” च्या कव्हर साँगला ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंतच्या सुमधुर आवाजाची साथ !
या गाण्याला नीलकमल सिंह आणि ममता शर्मा यांनी स्वर दिले आहेत. धीरज बबुआन यांनी गीतलेखन केले असून, नीलकमल सिंह आणि आदित्य देव यांनी संगीतबद्ध केले आहे. तर कोरिओग्राफीची जबाबदारी राहुल शेट्टी यांनी सांभाळली आहे.गाण्याविषयी बोलताना नीलकमल सिंह म्हणाले, “फुलौरी बिना चटणी कैसे बनी हे गाणे आधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे. धमाल 4 साठी या गाण्याची ऊर्जा आणि चित्रपटातील पात्रांची मस्ती एकदम साजेशी वाटली. या गाण्यावर काम करताना खूप आनंद मिळाला आणि प्रेक्षकांनाही ते तितकेच आवडेल, असा मला विश्वास आहे.”
गायिका ममता शर्मा म्हणाल्या, “धमाल ही माझ्या आवडत्या फ्रँचायझींमधील एक आहे. त्यामुळे या चित्रपटातील गाण्याला आवाज देणे माझ्यासाठी खास अनुभव ठरला. चटणी या गाण्याला आधीच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याच उत्साहाला नव्या रूपात धमाल 4 मधून सादर करणे खूप रोमांचक होते. हे गाणे ऊर्जा, आनंद आणि उत्सवाचा परिपूर्ण मिलाफ आहे.”
सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या धमाल 4 मध्ये अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांच्यासह ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवि किशन महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.टी-सीरिज आणि गुलशन कुमार प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवगण फिल्म्स, टी-सीरिज फिल्म्स, मारुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.’धमाल 4′ येत्या 10 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
