पंढरपुरमध्ये रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण; भाजपकडून आंदोलकांवर कारवाईचीही मागणी

रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते पक्ष म्हणून नाही केलेले. हे सर्व राज्याने पाहिले. आम्हीही त्या आंदोलनात होतो.

News Photo   2026 06 16T111657.979

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात आमदार रोहित पवार (Pawar) पंढरपूर येथे आंदोलनाला बसले होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून रोहित पवार यांनी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केलं.आता रोहित पवार ज्याठिकाणी आंदोलनाला बसले होते, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रोहित पवार यांच्या अन्नत्याग स्थळी भाजपा कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिपडले. आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा माऊली हळणवर यांनी केला.

त्याचबरोबर जे कोणी आंदोलनात सहभागी होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशीही मागणी यादरम्यान त्यांनी केली. या आंदोलनामुळं पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव यांच्याकडून गोमूत्र शिपडण्यात आलं. यावेळी काही घोषणा देखील देण्यात आल्या. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाल्याचा दावा करण्यात आला.

उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा

या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सक्षणा सलगर म्हणाल्या, मला या गोष्टीचं आर्श्चय वाटतं की, अशी जी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीची देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन किंवा प्रदेशाध्यक्ष त्यांनी इकडं लक्ष दिलं पाहिजे. हे असं गोमूत्र शिंपडून काय सिद्ध करतो आपण? थोडे नीट पेपर फुटीवर बोलावं, देशामध्ये काय चाललंय यावर बोलायला हवं. पण या लोकांची त्यावर बोलायची पात्रता उरलेली नाही असा टोला त्यांनी लागवला.

रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते पक्ष म्हणून नाही केलेले. हे सर्व राज्याने पाहिले. आम्हीही त्या आंदोलनात होतो. मला वाटते की, प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाहीये. शरद पवार यांचे काम सूर्याप्रमाणे आहे, कोणीही उठावे आणि काहीही बोलावे, याला महत्व नाही. हे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. कोणीही काही टिका करावी, याला महत्व नाही. सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी कोणी काम केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे.

follow us