कर्जमाफीआधीच सत्कार करणं म्हणजे…, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्कारावर शेट्टी यांचा आसूड
विहीर खोदण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेलं कर्ज मुक्त करणे याला कर्जमुक्ती असे म्हणतात.
राज्यातील कर्जमाफीबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी (Farmer) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, कर्जमाफीचा निर्णय हा मूठभर शेतकऱ्यांना फायद्याचा तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा आहे. मुख्यमंत्री हे अर्थशास्त्राचे जाणकार आहेत. त्यांनी वीस वर्षांपूर्वी पुस्तक लिहिलं होतं, अर्थसंकल्प कसा सादर करावा त्याला मी देखील हजर होतो.
विहीर खोदण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेलं कर्ज मुक्त करणे याला कर्जमुक्ती असे म्हणतात. ही कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली आहे. ज्यांचे शेत आहे, ज्यांचे अर्धा एकर द्राक्ष आहेत, ज्यांचे डाळिंब आहे, तो छोटा शेतकरी आहे, त्याला फायदा होणार नाही. परदेशी राहणारा एक माणूस या समितीत आहे, त्यांना शेतकऱ्यांचे वाटोळ करायचं आहे ते केलं आहे. यातून फक्त काहीच मूठभर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
कर्जमाफीच्या निर्णयानंतर दुसरी दिलासादायक बातमी; वीजबीलाबद्दल मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे. जे इन्कम टॅक्स भरतात ते देखील गरीब शेतकरी आहेत फक्त त्यांच्या खात्यावर पैसे येतात त्यामुळं ते इन्कम टॅक्स भरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जो कारखान्याला ऊस वाहतूक करतो त्याला कारखान्याचे पैसे येतात, ते वाटप करायचे असतात, मात्र त्याच्या खात्यावर येतात, त्याच्यामुळे तो वंचित राहतो आहे. त्यामुळे ही लोक देखील कर्जमाफीमध्ये आली पाहिजे, असंही शेट्टी म्हणाले आहेत.
कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याआधीच सत्कार करणं म्हणजे हा लाळगोटेपणा आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेणं असं याला म्हणतात. 30 जुलैच्या आधी देखील शेतकरी कर्जमाफी होणार नाही, आणखी नवीन तारीख मिळेल. 30 जुलैच्या आधी जर कर्जमाफी झाली नाही तर 30 जुलै नंतर आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहोत असंही ते म्हणाले., जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जे नियमीत कर्ज भरतात त्यांचं काय प्रामाणिकपणे राहून देखील त्यांना फक्त 50 हजार रुपये मिळणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.