शरद पवारांना टाकलं मागे! देवेंद्र फडणवीस ठरले महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे तिसरे मुख्यमंत्री

Devendra Fadnavis third longest duration CM यांनी राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या यादीत वरच स्थान मिळवलं आहे.

Devendra Fadnavis Third Longest Duration CM

Devendra Fadnavis third Chief Minister of Maharashtra to hold office for longest duration Sharad Pawar left behind : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एक विक्रम रचला गेला आहे. कारण फडणवीस यांनी राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत वरच स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांनी या यादीत नाव असणाऱ्या शरद पवारांना देखील मागं टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

नोकरी बदलणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! EPFO ने PF ट्रान्सफरसाठी दिले दोन सोपे पर्याय; जाणून घ्या डिटेल्स

12 जुलै 2026 पर्यंत फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच 2430 दिवस म्हणजे 6 वर्षे 7 महिने इतका झाला आहे. तर शरद पवार हे राज्याचे 2412 दिवस मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असल्याने ते दिवसेंदिवस राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी वरच स्थान मिळवण्याकडे वाटचाल करत आहे.

महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते कोणते?

वसंतराव नाईक – 11 वर्षे, 78 दिवस
विलासराव देशमुख – 7 वर्षे, 129 दिवस
देवेंद्र फडणवीस – 6 वर्षे, 7 महिने (12 जुलै 2026 पर्यंत)
शरद पवार – 6 वर्षे, 221 दिवस

किराणा, कपडे अन् मोबाईल, लोकांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? केंद्र सरकार करणार मोठा सर्व्हे

फडणवीस हे 31 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचं वय 44 होतं. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर 20219 च्या निवडणुकीनंतर ते 80 तासांसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले. परंतु तेव्हा अजित पवार यांनी त्यांचा पाठिंबा मागे घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 30 जून 2022 पासून ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द 1992 मध्ये नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरू झाली. 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले होते.

यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेता; उपांत्यमध्ये जोकोविच अन् फायनलमध्ये फ्रेंच ओपन विजेत्याला हरवलं

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरआरएस) सदस्य आहेत. फडणवीस यांनी 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून जिंकली होती. त्यानंतर 2009 साली ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार झाले. नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

follow us