तीन दिवसांपासून अन्न नाही; रोहित पवारांची तब्येत खालावली, पत्नी मुलांना अश्रू अनावर

सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे.

News Photo   2026 06 14T180541.138

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट (Rohit Pawar) दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी अट घालण्यात आली आहे, की ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना जर दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना दोना लाख रुपयांपेक्षा अधिकची जी रक्कम आहे, ती एकरकमी भरावी लागणार आहे. जर समजा एखाद्या शेतकऱ्यावर तीन लाख रुपयांचं कर्ज असेल तर त्याला जर या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आधी एक लाख रुपये भरावे लागणार आहे.

सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे. ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सरकारने ही अट रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा, राजकारण बाजूला ठेवण्याचं सरकारला केलं आवाहन

दरम्यान तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे. रोहित पवार यांचा बीपी आणि शुगर लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रोहित पवार यांना सलाईन लावण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून तयारी सुरू आहे. परंतु त्यांनी सलाईन लावण्यास नकार दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा मला फोन आला आहे, ते दोन तासांमध्ये इथे येत आहेत. घरच्यांची मी माफी मागतो. परंतु, जोपर्यंत मंत्री इथे येत नाहीत आणि त्यांच्यासोबत माझी चर्चा होत नाही, तोपर्यंत मी ओआरएस घेणार नाही असं रोहित पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर डॉक्टरांनी रोहित पवार यांची तब्येत तपासून सलाईन घेण्याची विनंती केली ती त्यानी फेटाळली आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, मंत्री इथ येत नाहीत तोपर्यंत सराईन पण लावणार नाही. सरकारचे प्रतिनिधी इथे आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू, ते काही ठोस शब्द देतील असा मला विश्वास वाटतो असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि त्यांचा मुलगा देखील आंदोलनस्थळी आहेत, रोहित पवार यांचं कुटुंब भावुक झालं असून, डोळ्यात पानी आल्याचं पहायला मिळत आहे.

follow us