Download App

Dharmveer 2: सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय… ‘धर्मवीर 2’ची नवीन रिलीज डेट जाहीर

Dharmaveer 2 Movie: सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.

Dharmaveer 2 Release Date: गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. (Marathi Movie) काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर – 2’ (Dharmaveer 2) ह्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. (Social Media) ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आले होते.


सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती ,अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते ,परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार ? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. ‘धर्मवीर – 2’ हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.


राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय घेतला होता

बहुचर्चित ‘धर्मवीर – 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. 9 ऑगस्टला ‘धर्मवीर – 2’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

Dharmaveer 2: राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

2022 ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला. दिघे साहेबांचे कार्य खुप मोठे आहे जे केवळ एका भागत दाखवणे शक्य नाही. दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे “कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” कारण नेत्याने लोकांच्या सुख- दुःखात, अडी-अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे. प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही. मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांचे काम छान झाले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला. त्यापेक्षाही हा चित्रपट डबल हीट होईल अशा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो. असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.

follow us