Dharmaveer 2: राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय, ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

Dharmaveer 2: राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय, ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

Dharmaveer 2 Release Date Postponed: बहुचर्चित ‘धर्मवीर – 2’ या (Dharmaveer 2 Movie) चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. (Marathi Movie) 9 ऑगस्टला ‘धर्मवीर – 2’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. (Pravin Tarde ) ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून (Social Media) प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)


चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता “धर्मवीर – 2” हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले.

Dharmaveer 2: चला करू तयारी..’धर्मवीर 2′ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

2022 ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला. दिघे साहेबांचे कार्य खुप मोठे आहे जे केवळ एका भागत दाखवणे शक्य नाही. दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे “कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” कारण नेत्याने लोकांच्या सुख- दुःखात, अडी-अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे. प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही. मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांचे काम छान झाले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला. त्यापेक्षाही हा चित्रपट डबल हीट होईल अशा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो. असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.

Exclusive: CM एकनाथ शिंदेची सिनेमात एन्ट्री, ‘धर्मवीर 2’ मध्ये साकारणार स्पेशल रोल

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित “धर्मवीर – 2” या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदेसाहेब असो किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणेच शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशिर्वाद देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. मलाही सिनेमा काढायचा आहे पण अजुन थोडा वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा करेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल. चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube