Actor Dharmendra’s Car Collection : बॉलिवूडचे “ही-मॅन” आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. मात्र, त्यांची आलिशान जीवनशैली आणि उल्लेखनीय प्रवास नेहमीच लक्षात चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. आलिशान जीवनशैली जगणाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली. धर्मेंद्र यांना चारचाकी गाड्यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या बंगल्यात असंख्य महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. ज्या त्यांच्या शाही जीवनशैलीची साक्ष देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली चारचाकी (Four Wheeler) कोणती आणि किती रूपयांना घेतली होती.
धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते… ते एक युग होतं, ती होती एक भावना…
धर्मेंद्र यांची पहिली कार कोणती होती?
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली, त्याच वर्षी त्यांनी त्यांची पहिली कार देखील खरेदी केली. 11 ऑक्टोबर 2021 रोजी धर्मेंद्र यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून (aapkadharm) एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टसोबत धर्मेंद्र यांनी 25 सेकंदांचा व्हिडिओदेखील शेअर केला होता. ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली कार कोणती आणि कोणत्या वर्षी खरेदी केली आणि त्यावर त्यांनी किती पैसे खर्च केले याची माहिती दिली होती.
धर्मेंद्र पहिल्या कारची किंमत
इंस्टाग्राम पोस्ट शेअर करताना धर्मेंद्र यांनी कॅप्शन दिले होते की,, “मित्रांनो, FIAT ही माझी पहिली कार होती, माझ्या गोड बाळा… संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी हा देवाचा आशीर्वाद.” असे लिहित व्हिडिओमध्ये ही कार 18 हजारांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले होते.
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, पवारांना आठवला शोले सिनेमातील पाण्याच्या टाकीवरील प्रसंग
फियाटमध्ये कोणते इंजिन होते आणि त्याचा टॉप स्पीड किती होता?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांनी त्याकाळी विकत घेतलेले फियाटचे 1100 मॉडेल होते आणि त्यात 1.1 लिटर ओव्हरहेड व्हॉल्व्हचे इंजिन होते. जे 35.5 बीएचपी निर्माण करते. हे 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले होते आणि त्याचा टॉप स्पीड 150 किमी/तास होता.
धर्मेंद्र यांच्या कलेक्शनमध्ये कोण-कोणत्या कार्स?
धर्मेंद्र यांच्याकडे पोर्श केयेन, ऑडी A8, लँड रोव्हर रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि मर्सिडीज SL500 यांसारख्या महागड्या आणि आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.
