ब्रेकिंग : साराभाई Vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सतीश शाह यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये आलेल्या 'अजीब दास्तान' चित्रपटाने झाली असली तरी, त्यांना 'जाने भी दो यारों' या चित्रपटाने ओळख मिळाली
Veteran Actor Satish Shah Passes Away At the Age Of 74 : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातून एक दुःखद वृत्त समोर आले असून, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे आज (दि.25) निधन झाले आहे. अद्भुत कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या शाह यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सतीश शाह किडनीच्या आजाराशी झुंजत होते. प्रसिद्ध निर्माते आणि आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी सतीश शाह यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झाला. सतीश शाह यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती आणि हीच इच्छा त्यांना मुंबईत घेऊन आली. सतीश शाह यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये आलेल्या ‘अजीब दास्तान’ चित्रपटाने झाली असली तरी, त्यांना ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटाने ओळख मिळाली.
Actor Satish Shah, best known for 'Jaane Bhi Do Yaaro' and 'Sarabhai vs Sarabhai', has died: manager
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2025
मृतदेह बनून पटवली ओळख
१९८३ मध्ये आलेल्या “जाने भी दो यारों” या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर, सतीश शाह, नीना गुप्ता आणि रवी वासवानी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे नाव “जाने भी दो यारों” असे होते, परंतु यापैकी कोणीही कलाकार ते सोडू शकले नाही, कारण हा त्यांच्या कारकिर्दीचा प्रश्न होता. कुंदन शाह दिग्दर्शित हा चित्रपट एक डार्क कॉमेडी होता ज्यामध्ये व्यंगाचा स्पर्श होता. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी आणि पंकज कपूर सारख्या कलाकारांना भरपूर काम होते, परंतु काही दृश्यांनंतर सतीश शाह यांना संपूर्ण चित्रपटासाठी मृतदेह म्हणून कास्ट करण्याचा रोल मिळाला. पण, मृतदेहाच्या रोलनेच सतीश शाह संपूर्ण चित्रपट वेगळ्या वळणावर नेत स्वतःची ओळख निर्माण केली.
View this post on Instagram
यशाचा मार्ग खुला
‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट अजूनही ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा राखून आहे. या चित्रपटातील सर्व प्रमुख दृश्ये तुम्हाला नक्कीच हसवतील, मग ती महाभारतातील कपडे उतरवण्याचा सीन असो किंवा तो अचानक शवपेटीतून गाडी चालवताना दिसणारा सीन असो. प्रत्येक मोठ्या सीनमध्ये सतीश शाह एका मृतदेहाच्या रूपात दिसले. तथापि, त्याच्या अभिनय कौशल्यामुळेच त्याचा चेहरा पाहून प्रेक्षक हास्य फुलवायचे. चित्रपटात सतीश शाह डी’मेलो नावाच्या माणसाची भूमिका साकारली होती. जो एक मृतदेह आहे, तरीही तो चित्रपटाचा आत्मा आहे. त्यानंतर सतीश शाह अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले.
एक मालिका ५० किरदार
चित्रपटसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर, सतीश शाह यांनी टेलिव्हिजन जगातही अनेक भूमिका केल्या. त्यांनी साराभाई विरुद्ध साराभाई, नहले पे दहला आणि फिल्मी चक्कर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आणि ‘ये जो है जिंदगी’ मध्येही उल्लेखनीय काम केले. या एकाच मालिकेत त्यांनी ५० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. यातील प्रत्येक भूमिका खरोखरच उल्लेखनीय होती.
