Download App

कान्समध्ये मराठी चित्रपटांची चर्चा;’महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल’ला जगभरातील मान्यवरांची भेट

Cannes मध्ये जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Dignitaries from around the world visit ‘Maharashtra Filmcity Stall’ in Cannes : मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले आहे. देशोदेशीचे चित्रपट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत कान फिल्म फेस्टिव्हलचे वातावरण भारले आहे. जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जगभरातील मान्यवरांनी दिली भेट

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी चार मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने कान महोत्सवामध्ये पाठवण्यात आले आहेत. ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांबरोबर ‘जुनं फर्निचर’ हा मराठी चित्रपटही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवण्यात आले आहेत. या चारही चित्रपटांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांचे शिष्टमंडळ महोत्सवात सहभागी झाले असून मराठी चित्रपट आणि चित्रनगरीच्या प्रचार प्रसारा करता आकर्षक स्टॉल तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी – चित्रकर्मी या स्टॉलला भेट देत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळातर्फे या अभ्यागतांचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश वाव्हळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी मान्यवर येथे उपस्थित आहेत.

Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यात ‘स्थळ’,’स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती.

जरांगे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे निवडणुका आल्या की, उगवणारी छत्री; सदावर्तेंची टीका

फ्रान्समध्ये 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान्स चित्रपट महोत्सव संपन्न होत आहे. कान्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. महामंडळामार्फत सन 2016 पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती.

follow us