जरांगे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे निवडणुका आल्या की, उगवणारी छत्री; सदावर्तेंची टीका

Gunratna Sadavarte on Manoj Jarange for march in Mumbai : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे म्हणजे ज्या प्रमाणे पावसाळ्यात छत्र्या उगवतात. त्या प्रमाणे निवडणुका जवळ आल्या की, उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत. सदावर्ते हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, मनोज जरांगे म्हणजे ज्या प्रमाणे पावसाळ्यात छत्र्या उगवतात. त्या प्रमाणे निवडणुका जवळ आल्या की, उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत. असे लोक कुणासाठी तरी काम करत असतात.
संसदरत्न पुरस्कार 2025’ची घोषणा; महाराष्ट्रातील ९ खासदारांनी मारली बाजी, वाचा कोण आहेत?
त्यांच्यासोबत रेती आणि गुटखा माफिया असतात. काही पुढाऱ्यांचा त्यांना आधार असतो. अशांवर पानचट बोलण्यात काय फायदा आहे. गेल्यावेळी मीच जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना ते चूळबूळ वळवळ करायला लागला आहे. पण त्यांच्या कायदेशीर मुसक्या आवळल्या जातील. त्याचबरोबर जरांगे मराठ्यांचा कर्दनकाळ ठरला आहे. जरांगेच्या ढोंगामुळं मराठे नोकरीला लागले नाहीत. कारण त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण मिळू शकलेले नाही. पण तो फार काळ टीकणार नाही. कारण तो कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत…
मनोज जरांगे पुन्हा अॅक्टिव्ह; उपोषणाची तारीख ठरली, मुंबई पुन्हा चक्काजाम
मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केलीयं. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोशल मीडियावरील जिल्हाध्यक्षांची ‘ती’ यादी बनावटच; रवींद्र चव्हाणांनी नेमकं काय सांगितलं?
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं.