Download App

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट शूटिंगचे ‘चॅलेेंज’ पूर्ण

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie) आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. (Marathi Movie) यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात ‘मुक्ताई’ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देताना सांगितले की, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच दैवी होता आणि विलक्षण आंतरिक शांती प्रदान करणारा होता. आमच्या संपूर्ण टीम ने या चित्रीकरणाच्या दरम्यान अतीव मानसिक समाधान मिळाल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले असून ए.ए.फिल्म्स प्रस्तुत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Bapalyok: बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’ आता अॅमेझॅान प्राईमवर

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटात ‘मुक्ताई’ यांचे बालपण आणि त्यांचा अध्यात्माचा प्रवास दाखविला जाणार आहे. आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली. केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.


स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा एक अनोखा आदर्श उभा केला आहे. अशा या ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आगामी ‘मुक्ताई’ मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘शिवराज अष्टका’तील सिनेमाना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहेत. ‘मुक्ताई’ सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

follow us

वेब स्टोरीज