Baaplyok : बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’ आता अॅमेझॅान प्राईमवर

Baaplyok : बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’ आता अॅमेझॅान प्राईमवर

Baaplyok Movie Amazon Prime Video: ‘बापल्योक’ (Baaplyok Movie) चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी (Marathi Movie ) कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) ‘संत तुकाराम’ (Sant Tukaram) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ (Amazon Prime) वर आला आहे.

‘बापल्योक’ या सिनेमामध्ये बाप लेकाची एक हलकाफुलका प्रवास पाहायला मिळाला आहे. या सिनेमाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नुकतंच या सिनेमा प्रदर्शित करण्यात आले आहे.

नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले होते. त्यामध्ये त्यांनी एक चौकनी कुटुंब बघायला मिळणार आहे. यामध्ये एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण बघायला मिळत आहे. यामध्ये ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे बघत असल्याचे दिसून आले आहे.

Gavran Meva मध्ये ही ‘प्रभु श्रीरामां’चा सोहळा साजरा; 151 वा भाग नक्की पाहा…

सिनेमाबद्दल बोलत असताना नागराज यांनी सांगितले आहे की, सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जात असतात. अर्थात या नात्यात एक सूर गवसला आहे तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने सिनेमातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटल्याचे सांगितले आहे. ही गोष्ट मला भावली आणि मी सिनेमासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ या सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने आणि विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या २५ ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांना पाहायला मिळाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज