Gavran Meva मध्ये ही ‘प्रभु श्रीरामां’चा सोहळा साजरा; 151 वा भाग नक्की पाहा…

Gavran Meva मध्ये ही ‘प्रभु श्रीरामां’चा सोहळा साजरा; 151 वा भाग नक्की पाहा…

Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. नुकताच या सिरीजचा 151 वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता गावरान मेवाचा नवीन भाग प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे ‘प्रभु श्रीराम’. यामध्ये नुकताच अयोध्येत पार पडलेल्या प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करताना दाखवण्यात आलं.

Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल

सगळ्या विश्वाला ज्या गोष्टीची उत्सुकता होती. त्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्यतील प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला दिमाखात पार पडला आणि ह्याच गोष्टीच औचित्त्य साधून कडक मराठी या युट्युब चॅनलवर पितांबरी जय श्रीराम मसाला अगरबत्ती प्रस्तुत ” गावरान मेवा – प्रभू श्रीराम विशेष भाग ” स्पेशल पार्टनर बोरोनील्स प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गावरान मेवा हा कार्यक्रम प्रेक्षकांचे वेगवेगळे आशय आणि विषय घेऊन कायमच प्रेक्षकांचा मनोरंजन करत आहे.

Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन

ह्या भागात सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश धोत्रे ह्याची विशेष भूमिका आहे. तसंच ह्याची कथा पटकथा संकेत पावसे ह्यांनी लिहली आहे. तर आशुतोष दाबके ह्यांनी ह्या विशेष भागाचे संवाद लिहले आहेत. ह्या भागात प्रेक्षकांना पितांबरी निर्मित प्रभू श्रीरामांच भजन पाहायला मिळणार आहे. तसाच सुप्रसिद्ध संगीतकार गायक पवन नाईक ह्यांनी सुद्धा एक विशेष भूमिका केली आहे. अशी माहिती कडक मराठी – गावरान मेवाचे प्रोजेक्ट हेड प्रणित मेढे ह्यांनी दिली.

Road Accident : चालकाची डुलकी बेतली जीवावर! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

या भागामध्ये नेहमीच गावाच्या चावडी वरती गप्पा मारणारा किंवा चर्चेत असणारा गणप्या याला नोकरी लागली आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीपासून गावातील त्याचे सर्व हितचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहेत. नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावर रुजू होताना गावातील लोकांना भेटत भेटत गणप्या आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो या दरम्यान त्याला एक साधू बाबा देखील भेटलेले दाखवण्यात आलं आहे.

तब्बल 2 किलो सोनं, 40 लाख कॅश; तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 100 कोटींचं घबाड!

तर त्याच दिवशी गावात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या साजरा करण्यासाठी राम मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावर गेलेला गणप्या भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. तरी देखील मंदिरात पोहोचला नसल्याने सर्वत्र चिंतेच वातावरण होतं. त्यामुळे गणप्यासोबत नेमकं काय झालं? हे पाहण्यासाठी तुम्ही कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) या वेब सीरिजचा 151 वा भाग नक्की पाहा.

गावरान मेवाच्या या भागात प्रकाश धोत्रे – (नाना), पवन श्रीकांत नाईक – (साधू बाबा आणि भजन गायक), लहूकुमार चोभे – (संजय), राहुल सुराणा – (मास्तर), महेश काळे – (गणपत), कुलदीप चव्हाण – (भजन गायक), भूषण गुरव – (भजन गायक), नवरतन वर्मा – (भजन गायक), श्रेयस शित्रे – (भजन गायक), मुलांशु परदेशी – (भजन गायक), तेजस आंधळे – (चंक्या), प्रदीप वाळके – (गोल्या), ऐश्वर्या कांबळे – (प्रिया), पल्लवी दिवटे – (सुगंधा), पूजा कानडे – (संजयची बायको), नेहा भोसले (गणपतची बायको), बजरंग तांदळे – (बजा), सचिन शिंगटे – (शाम), सुदर्शन कुलकर्णी – (पुजारी), विशेष सहकार्य – मनोज मुंदडा Adv.सुनिल बी. मुंदडा, दिपक काबरा, चंद्रकांत काबरा, सौ.संध्याताई मेढे, प्रोजेक्ट हेड प्रणित मेढे प्रोमो एडिटर – प्रमोद निक्रड, प्रशांत कांबळे, प्रशांत सोनवणे, ग्राफिक डिझाईनर – विजय म्हस्के, सागर वाळके

गाणे – जय श्रीराम , गायक – गौरव चाटी, गीतकार – विक्रांत हिरनाईक, संगीतकार – गौरव चाटी हे आहेत. संगीत निर्मीती- नयन मानी बर्मान, बासरी- किरण विणकर, कोरस – उमेश जोशी , सिद्धांत करवडे , प्रगती जोशी , शर्मिष्ठा भाटकर, गायन रचना – संचरी सेनगुप्ता, रेकॉर्डींग इंजिनिअर- जितेंद्र विश्वकर्मा , भानू पालीवाल, मिक्स अॅन्ड मास्टर- नयन मानी बर्मान, एपिसोड म्युझिक – टी. एम. पवार, विशेष आभार- साउंड्स बेस्ट स्टुडीओ, नागपूर , संकेत पावसे कथा पटकथा – संकेत पावसे, कथा विस्तार, संवाद – आशुतोष दाबके, दिग्दर्शक – विकास गोसावी यांनी केलं तर या सर्व भागाचं शुटींग हे खाकीदास बाबा मठ (लालटाकी,अहमदनगर) आणि बूथ हॉस्पिटल (अहमदनगर) या ठीकाणी पार पडलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube