Gavran Meva : प्रतिक्षा संपली ! ‘गावरान मेवा’ घेऊन गणप्या अन् सुगंधा आले प्रेक्षकांच्या भेटीला
Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सीरीजच्या आगामी भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नवरात्रानिमित्त गावरान मेवाचा खास भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आता एक घंटा देखील वाढवून मिळणार नाही आणि आरक्षण घेऊनच राहणार; जरांगे पाटील आक्रमक
गावरान मेवा ही सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. प्रेक्षकही नवीन पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. आता गावरान मेवाचा खास भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कडक मराठी या युट्यूब चॅनलवर वृद्धेश्वर अर्बन प्रस्तुत गावरान मेवा या सुप्रसिद्ध सीरिजच्या नवीन पर्वाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे.
Navratri 2023 : गरबा खेळणं पडल महागात; गुजरातमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
या नवीन पर्वामध्ये पहिला भाग हा नवरात्र स्पेशल असून स्त्री सन्मान हा पहिल्या भागाचा विषय आहे. प्रेक्षकांना हसवता हसवता सकारात्मक संदेश देणारी वृद्धेश्वर अर्बन प्रस्तुत गावरान मेवा ही सीरिज नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अनुष्का मोशन पिक्सचर्स अँड एंटरटेनमेंटचे बिजनेस हेड संकेत पावसे ह्यांनी व्यक्त केला.
वंचितने महाविकास आघाडीत यावे…; पवार-आंबेडकरांच्या भेटीवर कॉंग्रेस नेत्याचं मोठे विधान
या सिरीजमध्ये महेश काळे, लहू चोभे, पल्लवी दिवटे, तेजस आंधळे, ऐश्वर्या कांबळे, पूजा कानडे, नेहा भोसले, विलास पंडित, बजरंग तांदळे, राहुल सुराणा यांनी या भागामध्ये भूमिका साकराल्या आहेत. तर या सीरिजमध्ये ज्येष्ठ कलाकार शशिकांत नजन आणि श्रेणिक शिंगवी ह्यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.
त्याचबरोबर प्रोजेक्ट हेड – प्रणित मेढे, प्रॉडक्शन मॅनेजर – जनार्धन जायभाय, एपिसोड डिरेक्टर – मयूर आहेर, कॅमेरामन – आकाश बनकर, संकलन – विकास गोसावी, बॅकग्राऊंड म्युझिक – टी. एम.पवार, संगीतकार-गौरव चाटी, प्रोमो एडिटर- प्रमोद निक्रड यांनी केले आहे.