Navratri 2023 : गरबा खेळणं पडल महागात; गुजरातमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू
Navratri 2023 : नवरात्र (Navratri 2023) म्हटलं की, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यात गरबा किंवा दांडीया या नृत्यप्रकारांना विषेश महत्त्व आहे. तर तरूणाई याकडे जास्त आकर्षित होते. गुजरात या राज्याचं ते राज्यनृत्य आहे. तर आता जवळवपास देशभर आणि महाराष्ट्रात देखील या गरबा किंवा दांडीयाचं प्रस्थ वाढलं आहे. मात्र यामुळे अनेक दुर्घटना घडण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच घटना घडली आहे. ज्यामध्ये गरबामुळे 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
24 तासांत 10 जणांचा मृत्यू…
नुकतीच एक बातमी आली आहे की, गुजरातमध्ये एका 17 वर्षीय मुलाचा गरबा खेळत असताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. तर गरबामुळे 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 वर्षीय वीर शाहला गरबा खेळत असताना हार्ट अटॅक आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला. तेव्हा त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. तर त्याच्या मृत्यूनंतर आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ बंद केला.
वंचितने महाविकास आघाडीत यावे…; पवार-आंबेडकरांच्या भेटीवर कॉंग्रेस नेत्याचं मोठे विधान
तर आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर घटनास्थळी पोहचलेल्या वीरच्या आईने दुःखातून सावरत सर्वाना विनंती केली की, गरबा खेळताना स्वतःची काळजूी घ्या मध्ये मध्ये ब्रेक घ्या. दरम्यान नवरात्री आणि गरबा खेळताना अशा अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये तरूण मुलं मुली आपला जीव गमावत आहेत. याला कारण मोठ मोठ्या साऊंड सिस्टीम त्याच्या तालावर धरलेला ठेका तसेच मध्ये ब्रेक न घेणे, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करणे, पाणी न पिणे, तसेच जास्त एनर्जी वेस्ट करत गरबा खेळणे. हे सांगता येतील.
Naal 2 : मोठा झाला चैत्या, आईशी पुन्हा ‘नाळ’ जुळणार…
त्यामुळे सण उत्सव साजरे करताना काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील गणेशेत्सवामध्ये डीजेच्या आवाजाने अनेकांना कानाच्या , ह्रदयाच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. तसेच अनेकांचा यामध्ये दुर्देवी मृत्यू देखील झाला आहे.