Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut Criticized BJP on ED Investigation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर ईडीने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांना समन्स बजावले. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जहरी टीका केली. ‘राज्यात जे कुणी भाजपाच्या विरोधात आहेत त्यांना नोटीसा धाडल्या जातात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं (Devendra Fadnavis) राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखान यांचं राज्य आहे? मोगलाई आली आहे का? असा सवाल उपस्थित करत विरोधी नेत्यांना नोटीसा देणं हे भाजपाचं तंत्र आहे’, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल

‘सुनील राऊत यांनी दिलेल्या नोटिशीचे कारण हास्यास्पद आहे.आम्ही गुडघे टेकणारे लोक नाहीत. दोन-पाच लाखांसाठी, व्यवहारांसाठी तु्म्ही आम्हाला नोटिसा पाठवता. 38 कोटी पोपटलालने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केले. त्याची तक्रार विरून गेली. विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंगखाली 38 कोटी मुलुंडच्या पोपटलालने गोळा केले’, असा आरोप राऊत यांनी केला. ‘तुम्ही दिलेल्या नोटिसांना आम्ही आजिबात घाबरत नाही. अटक करायची असेल तर खुशाल करा. अजित पवारांना तुरुंगात टाकलं नाही. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं.’, असा आरोप राऊत यांनी केला.

या लोकांनी रोहित पवारांना नोटीस बजावली. किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावता. जे डरपोक लोक तुमच्या कळपात शिरले आहेत ना या लोकांना लाज वाटली पाहिजे. सुनील राऊत यांना दिलेल्या नोटिसीचं कारण हास्यास्पद आहे. पण, आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही. दोन पाच लाखांसाठी व्यवहारांसाठी तुम्ही आम्हाला नोटिसा बजावता, तुम्ही काय चिंचोके खाता का, असा सवाल राऊत यांनी भाजपाला केला.

मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, ‘भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी  

दरम्यान, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणला ईडीकडून अटक झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंधूंनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. सुनील राऊत यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणात ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे खिचडी घोटाळा?

कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली होती. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी पुरविण्याचे कंत्राट दिले होते. मुंबई महापालिकेने सांगितले की पहिल्या चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणचे नाव घेण्यात आले होते. यानंतर चव्हाण यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube