मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, ‘भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी…’

  • Written By: Published:
मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, ‘भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी…’

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या कॉलनंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा 

संजय राऊत यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना मातोश्रीबाहेर घातपात होणार असा एका तरुणांचा फोन पोलिसांना आला, याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, कोणते तरुण होते? काय होते, आम्हाला माहिती आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुसलमान नावं घेतली होती. या देशामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भाजपचं षडयंत्र आहे, असं राऊत म्हणाले.

‘इंडस्ट्री सोबत कोणताही संबंध नसताना हिरो होणं… ‘, ताहिर राज भसीनने मानले आभार 

ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची
राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातील डाऊटफूल सरकारची नाही. हे सुडाने पेटलेलं सरकार आहे. ज्याप्रमाणे ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे. त्यामुळं उद्या काही घडलं तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असंही राऊतांना ठणकावलं.

तर सुरक्षा ही कोणाचीही असो, त्याची जबाबदारी सरकारची आहे. मागच्या वेळेला संजय राऊत यांना बोगस माणसाने फोन करून धमकी दिली होती. त्यामुळं आता हा प्रकारही तसाच आहे का, याची खातरजमा करून गृहखातं काळजी जरुर घेईन. हा फोन कोणाचा होता, हे काही तासांतच समजेल. मातोश्रीची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

दरम्यान, याआधीही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर धमकीचा निनावी फोन आला होता. फोन करणार्‍याने आपण दाऊद टोळीचा हस्तक असल्याचा दावा करत आपण मातोश्री निवासस्थान उडवून देऊ, उद्धव ठाकरेंना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. आताही मातोश्रीबाहेर घातपात होणार असा फोन आला. त्यामुळं मातोश्रीबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीची माहिती समोर आली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज