काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज दावोस दौऱ्यावर (Davos tours) जाणार आहे. 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचं पन्नास जणाचं सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. या दाओस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार निशाणा साधला. या पन्नास जणांच्या शिष्टमंडळातील लोक हे सरकारशी संबंधीत नाहीत, काहींनी आपल्या मुलांनाही सोबत चालवलं, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
‘इंडस्ट्री सोबत कोणताही संबंध नसताना हिरो होणं… ‘, ताहिर राज भसीनने मानले आभार
आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलतांना ते म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसला जात आहेत. दावोसला जाणाऱ्या राज्याच्या शिष्टमंडळात 50 हून अधिक लोक आहेत. मात्र, यात एकही बिजनेसमन नाही. त्यात, अधिकारी, कर्मचारी, खासदार, खासजी एजन्सीजचे प्रचार, मुख्यमंत्र्यांचे ओसएडी यांचा समावेश आहे. काही जण तर मुलांनाही सोबत घेऊ जात आहेत. ही संख्या 70 च्या आसपास पोहोचली आहे. यातील बुहतेक जणांचा सरकारशी किंवा तिथं होणाऱ्या सामंजस्य कराराशी काहीही संबंध नाही, असं ठाकरे म्हणाले.
अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी
दावोसला माजी खासदाही जात आहेत. आधी गद्दारी केली की, गुवाहाटी, सुरतला जायला मिळालं, आता गद्दारी केली की, दावोसला जायला मिळतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
ते म्हणाले, या दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांसह केवळ 10 जण जाणं अपेक्षित आहे. एवढी लोक तर केंद्राच्या शिष्टमंडळातही नसतात. मात्र, हे तर अख्खं वऱ्हाड चाललंय. बॅंगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायलचा असेल तर एवढी लोकं नेली पाहिजेत, असा टोला त्यांनी लगावला.
धक्कादायक म्हणजे, या दौऱ्यावर जात असतांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रायलाची आणि वित्त खात्याची परवानगी लागते. मात्र, यापैकी केवळ 10 जणांनाच परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रवासाची परवानगी मिळाली आहे. बहुतेकांना परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता नाही आणि करदात्यांच्या पैशाची शिंदे सरकारकडून उधळपट्टी केली जात असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
गेल्या ते चार्डेट प्लेन घेऊन गेले होते. तेव्हा 28 तासांचा खर्च 40 कोटी आला होता. यावेळेस ते चार्टेड प्लेन घेऊन जात नाहीत. त्यांना आमची भीती असल्यानं ते खर्च कमी दाखवतील. मात्र, त्यांचा हॉटेल, वाहनांचा खर्च करदात्यांच्यापैशांतून होणार आहे, इतकी पैशांची उधळपट्टी कशासाठी? असा सवाला आदित्य ठाकरेंनी कला.