Road Accident : चालकाची डुलकी बेतली जीवावर! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Road Accident : चालकाची डुलकी बेतली जीवावर! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. समृद्धी महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आता यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडली आहे. आज पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला जोरदार धडक बसून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. नगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला हा अपघात झाला.

पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल 128 वर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. बसमधील काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Road Accident : बीडमध्ये पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. बहुतांश अपघात पहाटे किंवा मध्यरात्रीच्या सुमारास झाले आहेत. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त अपघात या महामार्गावर झाले आहेत. लोकांसाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळाच ठरत आहे. यामध्ये आतापर्यंत 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप किंवा डुलकी लागल्याने 183 अपघात झाले आहेत. तसेच टायर फुटून 51 अपघात झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे 200 अपघात घडले असून यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

Accident : भाविकांवर काळाचा घाला! जीप-कंंटेनरची समोरासमोर धडक; चार जागीच ठार

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्याकमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज