Accident : भाविकांवर काळाचा घाला! जीप-कंंटेनरची समोरासमोर धडक; चार जागीच ठार

Accident : भाविकांवर काळाचा घाला! जीप-कंंटेनरची समोरासमोर धडक; चार जागीच ठार

Accident : कर्नाटकातील गुलबर्गा येथून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर (Accident) काळाने झडप घातली. भाविकांच्या जीपला आज (बुधवार) पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर बाकीचे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत आधिक माहिती अशी,  कर्नाटकातील गुलबर्गा येथून काही भाविक तवेरा गाडीने शिर्डीला निघाले होते. तर त्याचवेळी एक कंटेवर फरशी घेऊन करमाळा मार्गे सालसेच्या दिशेने निघाला होता. आज पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील पांडे गावाच्या पुलाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरात होती की तवेरा गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटी पडली. यामुळे जीपमधील तिघे जण जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पुढे येत मयतांना बाहेर काढले. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले.  पोलिसांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे तर आठ महिन्यांचा चिमुकला मात्र सुखरुप बचावला आहे. तसेच तिघे जण जागीच तर एका जणाला रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यूने गाठले.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्याकमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे.

Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube