Shivrayancha Chava Release Date: दिग्पाल लांजेकार दिग्दर्शित (Directed by Digpal Lanjekar) ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) गेल्या काही दिवसापसरून या पुष्पातील पाचवे पुष्प चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Social media) ‘सुभेदार’ मराठी सिनेमानंतर चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chava ) 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात भेटीला येणार आहे.
तसेच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा मराठी आगामी सिनेमा नव्या वर्षात प्रदर्शित करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसाखाली या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली होती. दिग्दर्शकांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत सिनेमाचा प्रोमो शेअर केला होता. अद्याप तरी सिनेमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे, तोच सिनेमाने जागतिक स्तरावर रिलीजच्या अगोदरच एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर या मराठी सिनेमाचे पोस्टर झळकले आहे.
सध्या या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला जाणार आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने सोशल मीडियावरुन ही गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे…”
Box Office: ’डंकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; पाचव्या दिवशी फक्त ‘एवढीच’ कमाई
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बघायला मिळणार आहेत. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास आपल्याला सिनेमात बघायला मिळणार आहे. सिनेमा आगामी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.