Download App

Dil Dosti Deewanagi: ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर

Dil Dosti Deewanagi: ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Deewanagi) या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. (Marathi Movie) चित्रपटाच्या निर्मीती (premiere out ) आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवरांनी दिली. (Social media) ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

कलाकारांच्या अप्रतिम अभिनय संगीता सोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या सिनेमाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे सिनेमाचे दिग्दर्शक केले आहेत.

काही अनपेक्षित घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग आणि प्रेमाचा प्रवास कोणत्या वळणांनी घडत जातो याची रंजक अशी कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ या मराठी सिनेमात उलगडला आहे. या सिनेमात कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यामध्ये हटके अंदाजात बघायला मिळणार आहेत.

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधील अनोखा अंदाज पाहिलात का?

सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे. वेगवेगळ्या जॉनरची तीन गाणी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या सिनेमात आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, सोनाली पटेल यांच्या आवाजात सिनेमातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ सिनेमाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा इ. सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शकाची धुरा केशव ठाकूर यांनी सांभाळली आहे.

Tags

follow us