Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Jhimma 2 Release Date: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma ) ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. (box office) कोरोना काळानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणजे झिम्मा. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले होते. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता […]

Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Jhimma 2 Release Date: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma ) ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. (box office) कोरोना काळानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणजे झिम्मा. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले होते. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे.


‘झिम्मा’ या सिनेमामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी मुख्य भूमिका साकरली होती. आता या सिनेमाचा चा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकतंच अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

सायली संजीवने सांगितले आहे की, नुकतंच एक टीझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये तिने “तुमचे आमचे रियुनियन- झिम्मा २” असे म्हटले आहे. “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात…”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिल्याचे बघायला मिळत आहे.

Ekda Yeun Tar Bagha या सिनेमातील शार्प शूटर विशाखाचा रावडी लूक पाहिलात का?

मनोरंजनसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या सिनेमाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहेत.

Exit mobile version