Download App

Vadapav Movie : सोनू निगमचे खाणे अन् गाणे जाणून घेऊया ‘वडापाव’ च्या निमित्ताने

Vadapav Movie : सोनू निगम (Sonu Nigam) हा मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान गायक आहे. ९० आणि २००० चं दशक सोनूने चांगलंच गाजवलं आहे. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळत आहे. सिनेमात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो. सोनू निगम आता एक अनोखे खुमासदार गीत (song ) घेऊन येत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’सिनेमातील (Vadapav Movie) हे गीत असणार आहे.


एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, (Social media) एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच चाहत्यांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा मराठी सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाच्या आगोदरच या सिनेमाची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ सिनेमात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या सिनेमानी चाहत्यांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला आहे. यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ सिनांबद्दल सर्वांना खूपच उत्सुकता लागली आहे.

Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral

या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर सिनेमाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, सनिस खाकुरेल हे आहेत. या सिनेमाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसेच सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संगीतकार कुणाल करण ‘वडापाव’ या आगामी सिनेमाचे संगीतकार आहेत, तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला मिळणार आहे. या सिनमची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us