Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral

Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral

Gayatri Joshi Car Accident: बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘स्वदेस’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रातमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये गंभीर कार अपघात झाला आहे. (Social media) या घटनेवेळी गायत्री जोशी, आणि पती विकास ओबेरॉयसोबत तिच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातातून दोघेही थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांच्याशी धडकलेल्या फरारी या कारमधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याचा मात्र जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय एका आलिशान कारच्या शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला होता, असे माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी त्यांच्या लॅम्बोर्गिनी कारच्या मागे इतर अनेक फरारी कार गाड्या धावत होत्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


दरम्यान, मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना गायत्री आणि विकासची कार पुढे असणाऱ्या फेरारीला जोरदार धडकली आहे. या अपघातामध्ये फरारी कार तिच्या पुढे असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे, आणि तो ट्रक रस्त्यावरच उलटला असल्याचे बघायला मिळत आहे. ट्रक पलटी होताच फरारी कारने पेट घेतला आहे. हा गंभीर अपघात इटलीतील सार्डिनिया या ठिकाणी घडला आहे. तसेच या गंभीर अपघातानंतर अभिनेत्री गायत्रीने स्थानिक माध्यमांशी या घटनेबद्दल संवाद देखील साधला आहे. तसेच तिने या अपघाताची माहिती दिली आहे.

Rajinikanth Amitabh New Movie : तब्बल 32 वर्षांनंतर ‘बिग बी’-‘थलायवा’चा जलवा! ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

मिळालेल्या माहितीनुसार, ती तिचा पती विकासबरोबर इटलीला जात होती. दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. परंतु या अपघाताबद्दल तिने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. गायत्री जोशी अनेक दिवसापासून मनोरंजन क्षेत्रापासून खूप दूर राहिली आहे. ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केल्यावर, ती तिच्या संसारिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे नाव देशातील मोठ्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये सामील आहे. हा गंभीर अपघात प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube